Subscribe to our Newsletter
Loading
औरंगाबाद

घाटीत स्व.माँ साहेब मीनाताई ठाकरे कक्षाचे पालकमंत्री सुभाष देसाई यांच्या हस्ते लोकार्पण


औरंगाबाद : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (घाटी) जनतेच्या सेवेसाठी आमदार अंबादास दानवे यांच्या निधीतून रुग्णांसाठी उपचाराकरिता सुसज्ज व सर्व सोयीसुविधा असलेला स्वतंत्र असा स्व. माँ साहेब मीनाताई ठाकरे कक्ष स्थापन करण्यात आला आहे, या कक्षाच्या माध्यमातून रुग्ण ठणठणीत बरा होऊन घरी परतेल, असे मत व्यक्त करत पालकमंत्री सुभाष देसाई यांनी घाटी प्रशासनास शुभेच्छा दिल्या.
घाटीत मेडिसिन विभागात स्व. माँ साहेब मीनाताई ठाकरे कक्षाच्या कोनशिलेचे अनावरण श्री.देसाई यांच्याहस्ते झाले, यावेळी ते बोलत होते. यावेळी सर्वश्री आमदार अंबादास दानवे, संजय शिरसाट, विनोद घोसाळकर, माजी खासदार चंद्रकांत खैरे, नंदकुमार घोडेले, घाटीच्या अधिष्ठाता डॉ.कानन येळीकर, कर्करोग रुग्णालयाचे विशेष कार्यकारी अधिकारी डॉ.अरविंद गायकवाड आदी उपस्थित होते.
कोनशिलेचे अनावरण झाल्यानंतर श्री. देसाई यांनी फीत कापून व दीप प्रज्वलन करून कक्षाचे उदघाटन केले व कक्षाची माहिती जाणून घेतली. यावेळी कक्षाबाबत संपूर्ण माहिती अधिष्ठाता डॉ. येळीकर यांनी दिली, तसेच उपस्थित मान्यवरांचे स्वागत पुष्पगुच्छ देऊन केले.

Show More

mh20live

आपल्या हक्काचे लोकप्रिय रोखठोक डिजिटल व्यासपीठ MH20LIve 🎥🖋️ mh20live चॅनल आपल्या हक्काचे चॅनल आपल्या भागातील ताज्या घडामोडी,संस्कृती, मनोरंजन व क्राइम बातम्या बघण्यासाठी www.mh20live.com आमच्या चॅनललाsubscribe करून घंटी समोरील बटन दाबा. mh20live Network अल्पावधीतच प्रसिद्धी मिळत असून महाराष्ट्रभर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे.संर्पक [email protected] MH20Live हे न्यूज पोर्टल mh20live Network Group यांनी प्रसारित केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे. औरंगाबाद न्याय कक्ष)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
Close
Close