Subscribe to our Newsletter
Loading
क्राईम

नायगाव शहरात चोरट्यांचा धुमाकूळ पांच घरांचे चॅनलगेट तोडून जवळपास ७० हाजाराच्या मुद्देमालासह अज्ञात चोरटे लंपास


 ——————————
नायगाव ता / शेषेराव कंधारे 
                पंधरा दिवसाच्या विश्रांती नंतर पुन्हा एकदा चोरट्यांनी नायगांव शहरात पाच घरांचे चॅनल गेट तोडून तलाठी यांच्या खाजगी कार्यालयात  प्रवेश करून सत्तर हाजारा चा मुद्दे माला अंज्ञान चोरट्यांनी लंपास करून नायगांव पोलीसांना आवाहन दिल्याने शहरात भीतीचे वातावरण पसरले आहे.तलाठी  विलास गुंजकर यांच्या फिर्यादीवरून नायगांव पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांनी विरोध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 
      नायगांव शहरात चोरटे चोरी करण्यासाठी सुरक्षित ठरत आहेत. कारण चोर चोरी करून जातात नायगांव पोलीस कागदी घोडे नाचवत तपास चालु आहे हे उतर फिर्यादीला देतात. त्यामुळे नायगांव शहरात सदया चोरटे डोके वर काढल्याचे दिसुन येते . 22 डिसेंबर च्या 2 ते 3 च्या दरम्यान नायगांव शहरातील वेगवेगळ्या नगरात अज्ञात चोरट्यांनी चांगलाच धुमाकूळ घालत पांच घरांचे चॅनल गेटतोडण्या यशस्वी झाले आहे. 
         शिवाजी नगर येथील तलाठी विलास गुंजकर याचे  खाजगी कार्यालय असुन ते कार्यालय अज्ञात चोरट्यांनी फोडुन तलाठी गुजंकर व तलाठी बळीराम  उजनकर यांचे असे दोन लॅपटॅप व तलाठी संदिप सोनवणे यांचे चलन भरलेल्या पावत्या व नगदी  हाजार रूपय आसे ६०  हाजाराचा मुद्दे माला अज्ञात चोरटयानी लंपास केला आहे. चोरटे एकाच चोरीवर समाधान न राहता तेजेराव पवार यांनी घरी नसल्याचे संधी साधत त्यांचे ही घर फोडले पण या ठिकाणी काही हाती लागले नसले तरी चोरट्यांनी एवढयावर न थांबता बाजुलाच दादाराव इंगळे यांचे घरांचे कुलुप फोडले तर सहयोग नगर येथील चांदु बोयाळ व होळकर यांच्या ही घराचे दाराना बाहेरून कोंडी लावले पण घरातल्या लोकांना जाग आल्याने आरडाओरड केल्याने चोरांनी धुम ठोकली.
   नायगांव शहरातील एका घरातुन ६० हजाराचा ऐवज  लंपास केले या प्रकरणी विलास गुंजकर यांच्या फीर्यादीवरून नायगांव पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांनी विरोध गुन्हा दाखल केला आहे . चार घरात चोरीचा प्रयत्न झाला पण घरातील माणसे जागी झाल्याने चोरट्यांचा डाव फसला पण या प्रकरणी कोणी ही फिर्याद दिले नाही . नायगांव शहरातील चो-यांचे सत्र थांबता थांबेना गेल्या पंधरा दिवसापूर्वी एकाच्या घरी चोरी झाली होती. पण आदयाप तपास मात्र नायगांव पोलीसांना लावता आला नसल्याने. चोरटयाना मात्र  नायगांव शहरात चो-या करण्यात आधिक रस दिसत आहे . चो-यांचे सत्र थांबवुन फीर्यादीला मुद्दे माल परत मिळवुन दयावा आशी मागणी होत आहे.नायगाव शहरात सतत होत असलेल्या चो-यांमुळे नागरीक भयभीत झाले आहेत त्यामुळे  नायगाव ठाण्याला एका कर्तव्य दक्ष अधिकारी गरज आहे अशी चर्चा जनतेतून होत आहे.

Show More

mh20live

आपल्या हक्काचे लोकप्रिय रोखठोक डिजिटल व्यासपीठ MH20LIve 🎥🖋️ mh20live चॅनल आपल्या हक्काचे चॅनल आपल्या भागातील ताज्या घडामोडी,संस्कृती, मनोरंजन व क्राइम बातम्या बघण्यासाठी www.mh20live.com आमच्या चॅनललाsubscribe करून घंटी समोरील बटन दाबा. mh20live Network अल्पावधीतच प्रसिद्धी मिळत असून महाराष्ट्रभर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे.संर्पक [email protected] MH20Live हे न्यूज पोर्टल mh20live Network Group यांनी प्रसारित केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे. औरंगाबाद न्याय कक्ष)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
Close
Close