Subscribe to our Newsletter
Loading
मराठवाडा

केजमध्ये लाच घेण्याऱ्या टाकळी सज्जाच्या तलाठ्यासह सहायकास पकडले रंगेहाथ


तहसील कार्यालयाच्या आवारात ही कारवाई झाल्याने उडाली खळबळ

बीड : केज तालुक्यातील टाकळी सज्जाच्या तलाठ्यासह सहायकास पन्नास हजार रुपयांची लाच स्वीकारताना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने टाकलेल्या छाप्यात रंगेहाथ पकडले.
केज तालुक्यातील टाकळी सज्जाच्या तलाठ्यासह सहायकास पन्नास हजार रुपयांची लाच स्वीकारताना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने टाकलेल्या छाप्यात रंगेहाथ पकडले. ही कारवाई तहसील कार्यालयाच्या आवारात शनिवार (ता. 9) रोजी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास करण्यात आली. ही कारवाई तहसील कार्यालयाच्या आवारात झाल्याने एकच खळबळ उडाली होती. तालुक्यातील टाकळी तलाठी सज्जाच्या कार्यक्षेत्रातील तक्रारदाराकडून सहायकाच्या माध्यमातून पाझर तलावात संपादित जमिनीसंबंधीचे क्षेत्र कमी दाखवण्यासाठी तब्बल एक लाख रुपयांची लाच मागितली होती. यात तडजोड होऊन तडजोडअंती सहायकाकडून पन्नास हजार रुपये स्वीकारताना शनिवारी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने शनिवारी दुपारी तलाठ्यासह सहायकास रंगेहाथ पकडले. तलाठी दयानंद शेटे (वय 50) असे लाचखोर तलाठ्याचे तर सचिन घुले (वय 31) असे पकडलेल्या सहायकाचे नाव आहे. दोोघा लाचखोरांविरोधात लाचलुचपत प्रतिबंधक कायद्याप्रमाणे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

Show More

mh20live

आपल्या हक्काचे लोकप्रिय रोखठोक डिजिटल व्यासपीठ MH20LIve 🎥🖋️ mh20live चॅनल आपल्या हक्काचे चॅनल आपल्या भागातील ताज्या घडामोडी,संस्कृती, मनोरंजन व क्राइम बातम्या बघण्यासाठी www.mh20live.com आमच्या चॅनललाsubscribe करून घंटी समोरील बटन दाबा. mh20live Network अल्पावधीतच प्रसिद्धी मिळत असून महाराष्ट्रभर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे.संर्पक [email protected] MH20Live हे न्यूज पोर्टल mh20live Network Group यांनी प्रसारित केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे. औरंगाबाद न्याय कक्ष)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
Close
Close