Subscribe to our Newsletter
Loading
क्राईम

रांजनगाव दांडगा येथे विवाहितेने दोन चिमुकल्यासह विहीरीत उडी घेऊनआत्महत्या

पैठण : 24 वर्षीय विवाहितेने आपल्या दोन चिमुकल्यांसह विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना पैठण तालुक्‍यातील रांजणगाव दांडगा येथे बुधवार दिनांक 3 फेब्रुवारी रोजी दुपारी एक वाजेच्या सुमारास घडली असून सायंकाळी ६ वाजे दरम्यान उघडकीस आली आहे आपल्या चार महिन्याच्या व तीन वर्षाच्या चिमुकल्यांसह विहिरीत उडी घेऊन विवाहितेने आत्महत्या केल्याच्या घटनेने पाचोड परिसर हादरले आहे मयत विवाहितेच्या माहेरच्या मंडळीने दिलेल्या तक्रार वरून वारंवार छळ केल्याप्रकणी पाचोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल             या घटनेसंबंधी अधिक माहिती अशी आहे की पैठण तालुक्यातील तुळजापूर येथील आयेशा शेख हिचा विवाह पैठण तालुक्यातील रांजणगाव दांडगा येथे इरफान शेख याच्या बरोबर चार ते पाच वर्षांपूर्वी झाला होता हे दोघेही कुटुंबातून विभक्त राहत होते त्यांना  तंजीला शेख चार महिने व आलिया शेख तीन वर्ष असे दोन चिमुकले आहेत मंगळवारी रात्री शेख इरफान व आयेशा शेख या दोघांत काही किरकोळ वाद झाल्याची माहिती ती समोर आली असल्याने तो राग मनात धरून बुधवार दिनांक 3 फेब्रुवारी रोजी आयेशा हिने घरातील सर्व सदस्य बाहेर गेल्याचे पाहून रांजणगाव दांडगा शिवारातील विहिरीवर जाऊन आपल्या दोन चिमुकल्यांसह 1 वाजेच्या दरम्यान विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली ज्या विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली त्या विहिरीच्या बाजूच्या शेतातील काही महिला विहिरीवर पाणी घेण्यासाठी गेले असता त्यांना विहिरीच्या काठावर चप्पल व ओढणी आढळली त्यांनी विहिरीत डोकावून बघितल्यानंतर चार महिन्याची तंजीला शेख हिचा मृतदेह पाण्यावर तरंगताना दिसला या घटनेची माहिती ग्रामस्थांना दिल्यानंतर तत्काळ ग्रामस्थ घटनास्थळी पोहोचून पाचोड पोलिसांना या घटनेची माहिती दिल्यानंतर पाचोड पोलिस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक सुरेश माळी पोलीस कॉन्स्टेबल गोरखनाथ कणसे यांच्यासह आदि कर्मचाऱ्यांनी धाव घेऊन ग्रामस्थ व पोलिसांच्या मदतीने तबबल 9 तासाच्या अथक परिश्रम नंतर या तिन्ही माय लेकरांचे मृतदेह बुधवार दिनांक 3 फेब्रुवारी रोजी रात्री नऊ वाजेच्या सुमारास विहिरीतून बाहेर काढून पाचोड येथील ग्रामीण रुग्णालयात उत्तरीय तपासणीसाठी दाखल केले आहेत गुरुवार दिनांक 4 फेब्रुवारी रोजी सकाळी दहा वाजेच्या सुमारास या तिन्ही मायलेकरांची उत्तरीय तपासणी करून नातेवाइकांच्या स्वाधीन मृतदेह करण्यात येणार आहेत या विदारक घटनेने पाचोड परिसर हादरले असून सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे  पाचोड पोलिस ठाण्यात आकस्मित घटनेची नोंद करण्यात आली होती मात्र मयत विवाहिताच्या माहेरच्या मंडळी ने दिलेल्या तक्रारीत असे म्हंटल की चार ते पाच वर्षा पूर्वी आयेशा व इरफान यांचे लागणे धार्मिक विधी प्रमाणे पार पडले त्यांना पहिली मुलगी आलीय ही झाल्या पासून सासरचे मंडळी वारंवार त्रास देत होते तर दुसरी ही मुलगीच झाल्याने परिवारात किरकोळ कारणावरून वाद होत होते सासरच्या मानसिक शारीरिक जाचाला कंटाळून ही घटना घडली असल्याचे नमूद केले आहे या या फर्यादी वरून पती इरफान बुऱ्हाण शेख, दीर इम्रान बुऱ्हाण शेख, जाऊ सुमाया इम्रान शेख व सासरा बुऱ्हाण बुढान शेख यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे  पुढील तपास पैठण उपविभागीय पोलीस अधीक्षक गोरख भामरे यांच्या मार्गदर्शनाखाली पाचोड पोलिस करत आहेत

शवविच्छेदन करणे वरून डॉक्टरांची एकमेकावर चालढकल
पैठण तालुक्‍यातील रांजणगाव दांडगा येथील विवाहितेने आपल्या दोन चिमुकल्यांसह आईची विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याप्रकरणी विवाहिते सह दोन्ही चिमुकल्याचे मृतदेह पाचोड येथील ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करण्यासाठी पोलिसांनी आणले होते रात्री उशिरा मृतदेह पोलिस पाचोड ग्रामीण रुग्णालयात दाखल केल्याने सकाळी पोलिसांनी पंचनामा पूर्ण करून  शवविच्छेदन करण्यासाठी दोन डॉक्टरांची मागणी केली मात्र एक ही डॉक्टर शवविच्छेदन करण्यास तयार न होता एक मेकावर चालढकल करतानाचे चित्र पाहवयास मिळाले अखेर पैठण कु उ बाजार समितीचे सभापती राजु भुमरे यांनी ग्रामीण रुग्णालयात दाखल होऊन व वरिष्ठ वैद्यकीय अधिकारी यांची भ्रमणध्वनी वरून कान उघडणी केल्या नंतर अखेर डॉ श्रीमती खरात व दोन शिकाऊ डॉक्टरच्या मदतीने शवविच्छेदन करण्यात आले

मयत विवाहितिचे नातेवाईक सासरच्या मंडळी विरुद्ध तक्रार देण्यासाठी पोलीस ठाण्यात असतानाच सासरच्या मंडळीने ग्रामीण रुग्णालयातून शवविच्छेदन होताच मृतदेह ताब्यात घेऊन अंत्यसंस्कार करण्यासाठी रांजणगाव दांडगा येथे नेल्याने मयत विवाहीतिच्या माहेरच्या मंडळीकडून काहीवेळ पाचोड पोलिस ठाण्यात तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं माहेरची मंडळी तक्रार देत असताना पाचोड पोलिस यांच्या मदतीने मृतदेह सासरच्या मंडळींनी ताब्यात घेऊन अंत्यसंस्कारासाठी नेले या प्रकरणाविषयी मयत विवाहिता आयेशा शेख हिने आत्महत्या केली नसून तिच्यासोबत घातपात झाले असल्याचा संशय व्यक्त करत नातेवाईकांनी सासरच्या मंडळींनी वारंवार छळ केल्याने ही घटना घडली असल्याच आपल्या फिर्यादीत म्हटले आहे

Show More

mh20live

आपल्या हक्काचे लोकप्रिय रोखठोक डिजिटल व्यासपीठ MH20LIve 🎥🖋️ mh20live चॅनल आपल्या हक्काचे चॅनल आपल्या भागातील ताज्या घडामोडी,संस्कृती, मनोरंजन व क्राइम बातम्या बघण्यासाठी www.mh20live.com आमच्या चॅनललाsubscribe करून घंटी समोरील बटन दाबा. mh20live Network अल्पावधीतच प्रसिद्धी मिळत असून महाराष्ट्रभर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे.संर्पक [email protected] MH20Live हे न्यूज पोर्टल mh20live Network Group यांनी प्रसारित केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे. औरंगाबाद न्याय कक्ष)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
Close
Close