Subscribe to our Newsletter
Loading
औरंगाबाद

औरंगाबादेत दुचाकी फिरणाऱ्यांनावर गुन्हा दाखल करून लायसन्स पण जब्त करणार- मनपा आयुक्त

ताज्या बातम्या साठी subscribers करा, बघत राहा www.mh20live.com

औरंगाबाद : शहरातील कोरोना विषाणूची साखळी तोडण्यासाठी १० ते १८ जुलै दरम्यान जनता कर्फ्यू लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या काळात दुचाकीवरून प्रवास करण्यास शहरात बंदी राहणार आहे. सकाळी सहा ते आठ या वेळेत नागरिकांना दूध मिळेल. फक्त सरकारी पेट्रोल पंप सुरू राहतील. बँका व मेडिकल बंद ठेवण्यासंदर्भात चर्चा सुरू असल्याचे महापालिका आयुक्त तथा प्रशासक आस्तिककुमार पांडेय यांनी मंगळवारी सांगितले.
औरंगाबाद शहरात कोरोना पाँझिटिव्ह रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे काल झालेल्या प्रशासकीय अधिकारी व लोकप्रतिनिधींच्या बैठकीत पुन्हा एकदा नऊ दिवस जनता कर्फ्यू लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. या पार्श्वभूमीवर महापालिका आयुक्त तथा प्रशासक अस्तिककुमार पांडेय पत्रकार परिषदेत म्हणाले, शहरात कोरोना पॉझिटिव रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असल्यामुळे हा जनता कर्फ्यू लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
जनता जनता कर्फ्यू यापूर्वीच्या लाँकडाऊन पेक्षा कडक असेल. पाँझिटिव्ह रुगांची सख्या कमी करणे आणि जास्तीत जास्त टेस्ट करण्याचा महापालिकेला प्रयत्न राहणार आहे. या काळात दुचाकीवरून प्रवास करण्यास शहरात बंदी राहणार आहे. सकाळी सहा ते आठ या वेळेत नागरिकांना दूध मिळेल. फक्त सरकारी पेट्रोल पंप सुरू राहतील. या ठिकाणी सरकारी वाहने व अत्यावश्यक सेवेसाठी असलेल्या वाहनांना पेट्रोल, डिझेल मिळेल.

पोलिसांना करणार सहकार्य

गेल्या तीन महिन्यांपासून पोलीस कोरोना संदर्भात उपाययोजना करण्यासाठी काम करत आहेत. त्यामुळे यावेळी महापालिकेचे सुमारे ४०० कर्मचारी काम करणार आहेत. शहरात सुमारे २०० पाँईट असतील, असे पांडेय यांनी सांगितले.

घरातल्या घरात तपासणीकडे वाढला कल, आरोग्याबाबत लातूरकर जागरूक

५० हजार टेस्टचे टार्गेट

जनता कर्फ्यूच्या काळात शहरात सुमारे ५० हजार टेस्ट करण्याचे टार्गेट ठेवण्यात आले आहे. शहरात बाहेर गावाहून येणाऱ्या प्रवाशांची तपासणी केली जाणार आहे. त्यासाठी पाच प्रवेशाच्या ठिकाणी पथके तैनात असतील, असेही प्रशासकांनी सांगितले

Show More

mh20live

आपल्या हक्काचे लोकप्रिय रोखठोक डिजिटल व्यासपीठ MH20LIve 🎥🖋️ mh20live चॅनल आपल्या हक्काचे चॅनल आपल्या भागातील ताज्या घडामोडी,संस्कृती, मनोरंजन व क्राइम बातम्या बघण्यासाठी www.mh20live.com आमच्या चॅनललाsubscribe करून घंटी समोरील बटन दाबा. mh20live Network अल्पावधीतच प्रसिद्धी मिळत असून महाराष्ट्रभर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे.संर्पक [email protected] MH20Live हे न्यूज पोर्टल mh20live Network Group यांनी प्रसारित केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे. औरंगाबाद न्याय कक्ष)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
Close
Close