Subscribe to our Newsletter
Loading
औरंगाबादकोरोंना अपडेट

औरंगाबादेत :44 रुग्णांची वाढ कोरोना पॉझिटिव्ह, रुग्णसंख्या 602 वर

राम नगरातील कोविडबाधिताचा मृत्यू, 44 रुग्णांची वाढ
औरंगाबाद/mh20live

मुकुंदवाडी येथील राम नगरातील 80 वर्षीय कोविड बाधित पुरूष रुग्णाचा आज 11 मे रोजी मध्यरात्री 1.10 मिनिटांनी उपचारादरम्यान मृत्यू झाला, असे घाटीचे माध्यम समन्वयक डॉ.अरविंद गायकवाड यांनी सांगितले.
घाटी रुग्णालयात ताप, खोकला आणि दम लागत असल्याने त्यांना 8 मे रोजी दुपारी भरती केले होते. त्यांचा 9 मे रोजी कोविड चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यांच्यावर 8 मेपासूनच कोविडसाठी अतिदक्षता विभागात उपचार सुरू होते. जास्त दम लागत असल्याने व शरिरातील ऑक्सिजनचे प्रमाण कमी होत असल्याने त्यांना 10 मेपासून व्हेंटिलेटरवर ठेवले होते. परंतु त्यांचे वय जास्त आणि न्युमोनिआ, श्वसनाचेही विकार असल्याने त्यांचा मृत्यू झाल्याचेही त्यांनी कळवले आहे.
जिल्ह्यात 44 कोविडबाधित रुग्णांची वाढ
औरंगाबाद जिल्ह्यातील विविध भागातील 44 कोविडबाधित रुग्णांची आज सकाळी वाढ झाल्याने आतापर्यंत 602 कोविडबाधित रुग्ण आढळले आहेत. रुग्णांचा औरंगाबाद शहरातील (कंसात रुग्ण संख्या) न्याय नगर (02), संजय नगर (01), एसआरपीएफ, सातारा परिसर (01), कोतवाल पुरा (01), एन-4 सिडको (01), सदानंद नगर, सातारा परिसर (08), बीड बायपास रोड (01), भवानी नगर, जुना मोंढा (03), पुंडलिक नगर, गल्ली क्रमांक 06 (01), दत्त नगर-कैलास नगर, लेन क्रमांक 05 (05), कैलास नगर (01), बायजीपुरा (01), राम नगर (06), किल्ले अर्क (08) आणि ग्रामीण भागातील सातारा गाव (01), गंगापूर तालुक्यातील फुलशिवरा (03) हा परिसर आहे. या रुग्णांमध्ये 27 पुरूष आणि 17 महिलांचा समावेश असल्याचे मिनी घाटी प्रशासनाच्यावतीने कळविण्यात आले आहे.
**

Show More

mh20live

आपल्या हक्काचे लोकप्रिय रोखठोक डिजिटल व्यासपीठ MH20LIve 🎥🖋️ mh20live चॅनल आपल्या हक्काचे चॅनल आपल्या भागातील ताज्या घडामोडी,संस्कृती, मनोरंजन व क्राइम बातम्या बघण्यासाठी www.mh20live.com आमच्या चॅनललाsubscribe करून घंटी समोरील बटन दाबा. mh20live Network अल्पावधीतच प्रसिद्धी मिळत असून महाराष्ट्रभर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे.संर्पक [email protected] MH20Live हे न्यूज पोर्टल mh20live Network Group यांनी प्रसारित केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे. औरंगाबाद न्याय कक्ष)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
Close
Close