Subscribe to our Newsletter
Loading
औरंगाबाद

पत्रकार ज्ञानेश्वर पाबळे यांच्यावर हल्ला करणाऱ्या आरोपींना तात्काळ अटक करा, एडिटर अँड प्रेस रिपोर्टर असोसिएशनची मागणी


औरंगाबाद – दिजाफराबाद येथील पत्रकार ज्ञानेश्वर पाबळे यांच्यावर हल्ला करणाऱ्या हल्लेखोरांना तात्काळ अटक करून त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी,अशी मागणी एडिटर अँड प्रेस रिपोर्टर असोसिएशनच्या वतीने विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांच्याकडे करण्यात आली आहे. असोसिएशनचे अध्यक्ष रतनकुमार साळवे यांच्या नेतृत्वाखाली मंगळवारी सायंकाळी पत्रकारांचे शिष्टमंडळ विभागीय उपायुक्त जगदीश मणियार यांना भेटले व त्यांना मागणीचे निवेदन दिले. जगदीश मणियार यांनी हे निवेदन विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांच्यावतीने स्वीकारले. व पुढील कारवाईचे आश्वासन दिले. या शिष्टमंडळात रतनकुमार साळवे, बबनराव सोनवणे, संजय सोनखेडे,जगन्नाथ सुपेकर कल्याण देहाडे, शेख अब्दुल राहुल सरोदे, हसन शहा, रवी बनकर, फिरोजखान पठाण, आधी पत्रकार उपस्थित होते. निवेदन सादर केल्यानंतर संघटनेचे अध्यक्ष रतनकुमार साळवे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले की, पत्रकारांवर सातत्याने हल्ले होत आहे.पत्रकार ज्ञानेश्वर पाबळे यांच्यावरील हल्ला हा चिंताजनक बाब आहे. पत्रकारांना निर्भीडपणे आपले कर्तव्य पार पाडणे शक्य व्हावे. यासाठी पत्रकार संरक्षण कायद्याची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यात यावी. हा कायदा सक्षम पणे अमलात आणला तर पत्रकारावरील हल्ले कमी होऊ शकतील. पत्रकार ज्ञानेश्वर पाबळे हल्ला प्रकरणी आरोपींना तात्काळ अटक करून कठोर कारवाई न झाल्यास लोकशाही मार्गाने आंदोलन छेडले जाईल असा इशाराही संघटनेचे अध्यक्ष रतनकुमार साळवे यांनी दिला.

Show More

mh20live

आपल्या हक्काचे लोकप्रिय रोखठोक डिजिटल व्यासपीठ MH20LIve 🎥🖋️ mh20live चॅनल आपल्या हक्काचे चॅनल आपल्या भागातील ताज्या घडामोडी,संस्कृती, मनोरंजन व क्राइम बातम्या बघण्यासाठी www.mh20live.com आमच्या चॅनललाsubscribe करून घंटी समोरील बटन दाबा. mh20live Network अल्पावधीतच प्रसिद्धी मिळत असून महाराष्ट्रभर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे.संर्पक [email protected] MH20Live हे न्यूज पोर्टल mh20live Network Group यांनी प्रसारित केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे. औरंगाबाद न्याय कक्ष)

Related Articles

Back to top button
Close
Close