Subscribe to our Newsletter
Loading
महाराष्ट्र

हिंमत असेल तर बांधावर जा, शेतकरी पायातलं काढून तुम्हाला सांगतील’

कोल्हापूर: कृषी कायदा बदलणार नाही, अशी घोषणा करणारे चंद्रकांत पाटील देशाचे पंतप्रधान आहेत की कृषिमंत्री? असा सवाल करतानाच, ते मुद्दाम आगीत तेल ओतत आहेत, असा आरोप राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी केला. दरम्यान, हिंमत असेल तर बांधावर जा, शेतकरी पायातलं काढून तुम्हाला सांगेल,’ असा सणसणीत टोला गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनी मारलाभाजप सरकारने मंजूर केलेल्या कृषी विधेयकास विरोध करण्यासाठी व दिल्लीत शेतकऱ्यांनी सुरू केलेल्या आंदोलनास पाठिंबा देण्यासाठी मंगळवारी भारत बंदची हाक देण्यात आली आहे. या बंदला महाविकास आघाडीचा पाठिंबा असल्याचे सांगून मंत्री मुश्रीफ म्हणाले, ‘राज्यातील जनतेने अत्यावश्यक सेवा वगळून कडकडीत बंद पाळावा. हा बंद शांततेत पार पाडण्याचे आवाहन करत ते म्हणाले, महाराष्ट्रात आंदोलनाला तीव्रता नाही असा आरोप माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे, पण, मुळात महाराष्ट्रात उसाला एफआरपी आहे, कापूस, तूर व इतर उत्पादनांना हमीभाव आहे आणि या संदर्भातील कायदे शरद पवार कृषिमंत्री असताना केलेले आहेत.’पालकमंत्री व गृहराज्यमंत्री सतेज पाटील म्हणाले, या बंदला पाठिंबा देण्यासाठी सर्वांनी उद्या आपल्या घरासमोर काळा झेंडा लावा. माझा काय संबंध असे न म्हणता प्रत्येकाने बंदमध्ये सहभागी व्हावे. ते म्हणाले, हा कायदा बदलणार नाही अशी भूमिका भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मांडली आहे . याचा अर्थ भाजप शेतकऱ्यांच्या विरोधात आहे हे स्पष्ट होते. त्यांच्यात हिंमत असेल तर त्यांनी बांधावर जाऊन शेतकऱ्यांना हे सांगावे. मग शेतकरी पायातील काढून त्यांना हा कायदा चुकीचा कसा आहे हे सांगतील असा टोलाही त्यांनी मारला.

s/o mt

Show More

mh20live

आपल्या हक्काचे लोकप्रिय रोखठोक डिजिटल व्यासपीठ MH20LIve 🎥🖋️ mh20live चॅनल आपल्या हक्काचे चॅनल आपल्या भागातील ताज्या घडामोडी,संस्कृती, मनोरंजन व क्राइम बातम्या बघण्यासाठी www.mh20live.com आमच्या चॅनललाsubscribe करून घंटी समोरील बटन दाबा. mh20live Network अल्पावधीतच प्रसिद्धी मिळत असून महाराष्ट्रभर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे.संर्पक [email protected] MH20Live हे न्यूज पोर्टल mh20live Network Group यांनी प्रसारित केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे. औरंगाबाद न्याय कक्ष)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
Close
Close