Subscribe to our Newsletter
Loading
लाईफ स्टाईल

घश्या मध्ये खवखव होत असेल तर, करा हा घरगुती गुणकारी उपाय, जाणून घ्या… आरोग्य

सामान्य सर्दी-खोकला, ताप, बॅक्टेरिअल आणि व्हायरस इन्फेक्शन अशा अनेक आजारांमुळे घसा खवखवतो. त्यामुळे डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार या आजारांवर उपचार घेणं गरजेचं आहे. मात्र खवखवणाऱ्या घशामुळे बोलतानाही त्रास होतो.

त्यामुळे तात्पुरत्या स्वरूपात आराम देण्यासाठी घरच्या घरी काही उपाय करता येतील. माय उपचारवर डॉ. लक्ष्मीदत्त शुक्ला यांनी काही उपाय सुचवलेत. बहुतेक आजार हे शरीरात पाण्याची कमतरता असल्यास म्हणजे डिहायड्रेशनमुळे उद्भवतात.

त्यामुळे पुरेशा प्रमाणात पाणी पिणं गरजेचं आहे. मात्र घशाची खवखव दूर करण्यासाठी कोमट पाणी प्या. आल्यामध्ये अँटिबॅक्टेरिअल आणि अँटिइन्फ्लेमेटरी घटक असतात, तसंच रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यासही मदत होते. आलं हे खवखवणाऱ्या घशासाठी उत्तम असा नैसर्गिक घटक आहे. एक इंच आलं किसून दोन कप पाण्यात टाकून हे पाणी उकळून घ्या. पाणी गाळून प्या. यामध्ये तुम्हाला हवं असेल तर तुम्ही मध आणि लिंबूरस टाकू शकता.

खोकला झाला ही आपली आई किंवा आजी आपल्याला मध प्यायला देते. त्यामुळे घसा खवखवत असेल तर एक चमचा मध तुम्ही असंच पिऊ शकता. तुम्ही कोमट पाण्यात मध आणि लिंबूरस टाकूनही पिऊ शकता.

तोंड, घसा आणि श्वसनसंबंधी समस्यांवर लवंग उपयुक्त आहे, असं सांगितलं जातं. लवंगामध्ये असा घटक असतो जो नैसर्गिक पेनकिलर आणि अँटिमायक्रोबिअल म्हणून काम करतो. लवंगाची पूड करून पाण्यात टाकून उकळू घ्या. लवंग घातलेलं असं कोमट पाणी प्या. या पाण्याने गुळण्याही करू शकता.

हळद ही औषधी मानली जाते. हळदीत अँटिमायक्रोबिअल घटकही असतात. त्यामुळे फक्त रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी आणि जखम भरण्यासाठीच नव्हे तर घशाच्या खवखवीवरही हळद उपयुक्त आहे. त्यामुळे कोमट दुधात हळद मिक्स करून प्या.

Show More

mh20live

आपल्या हक्काचे लोकप्रिय रोखठोक डिजिटल व्यासपीठ MH20LIve 🎥🖋️ mh20live चॅनल आपल्या हक्काचे चॅनल आपल्या भागातील ताज्या घडामोडी,संस्कृती, मनोरंजन व क्राइम बातम्या बघण्यासाठी www.mh20live.com आमच्या चॅनललाsubscribe करून घंटी समोरील बटन दाबा. mh20live Network अल्पावधीतच प्रसिद्धी मिळत असून महाराष्ट्रभर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे.संर्पक [email protected] MH20Live हे न्यूज पोर्टल mh20live Network Group यांनी प्रसारित केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे. औरंगाबाद न्याय कक्ष)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
Close
Close