Subscribe to our Newsletter
Loading
औरंगाबाद

गावाचे नेतृत्व सक्षम असल्यास विकासाला चालना व योग्य दिशा मिळते:रावसाहेब दानवे

सिल्लोड: राजकारणात बदल घडत असतात. नव्याने नेतृत्व उदयास येऊन नवीन कार्यकर्ते घडत असतात. मात्र गावाचा विकास हेच ध्येय समोर ठेऊन भाजपच्या प्रत्येक कार्यकर्त्यांनी कार्य करण्याची गरज आहे. असे प्रतिपादन केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी सिल्लोड तालुक्यातील नवनिर्वाचित सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य यांच्या जाहीर सत्कार समारंभ निमित्ताने बोलताना केले यावेळी माजी आमदार सांडू पाटील लोखंडे, प्रदेश चिटणीस इद्रीस मुलतानी, माजी सभापती अशोक गरुड, ज्ञानेश्वर तायडे, सुनील मिरकर, माजी चेअरमन श्रीरंग साळवे, माजी तालुकाध्यक्ष दिलीप दानेकर, शहराध्यक्ष कमलेश कटारिया मनोज मोरेल्लु तालुका सरचिटणीस किरण पवार , अशोक तायडे यांची प्रमुख उपस्थिती होतीयावेळी बोलताना दानवे म्हणाले की सरपंच व ग्रामपंचायत सदस्य यांनी गावाचा विकास करण्यासाठी प्रयत्न करावेत. ग्रामपंचायतीच्या निवडणुका संपल्या असून, सर्व हेवे दावे सोडून गावाच्या विकासासाठी सर्वांनी एकत्र येऊन गावाच्या विकासासाठी प्रयत्न केले पाहिजेत असे आवाहन नवनिर्वाचित सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य यांना केलेयंदा ग्रामपंचायत निवडणुकीत अनेक तरुण निवडून आले आहेत . या तरुण सदस्यांनी असे काम करावे की गावकऱ्यांनी म्हणाले पाहिजे पहिल्यांदा निवडुन आला पण याने गावात चांगले काम केले आहे . राजकारणात पुढे जायचे असेल तर आधी लोकांचा विश्वास संपादन करा . कारण लोकांचा विश्वास संपादन केल्या शिवाय पुढे जाताच येत नाही राज्यातील तीन पक्षाचे तिघाडी चे सरकार हे शेतकरी विरोधी असून ऐन संकटाच्या काळात रब्बी हंगामातील पिकांना पाणी देण्याच्या उंबरठ्यावर शेतक – यांचा वीजपुरवठा खंडित केला असून शेतक – यांना संकटात आणले आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी आपण लढा दिला पाहिजे असे यावेंळी बोलताना सांगितलेगजानन राऊत,अरुण काळे, गणेश बनकर, सुभाष मानकर, कैलास जंजाळ दादाराव आळणे, संजय डमाळे, मधुकर काळे, नारायण बडक साहेबराव बांबर्डे, अनिल खरात, विजय वानखेडे, दिलीप गवळी, किशोर गवळे, अनिल बनकर, दत्ता बडक, राधाकृष्ण काकडे, सोमीनाथ कळम, अमोल शेजुळ गणेश भूमकर, अरुण राठोड, संजय अपार, सूर्यभान बनसोड, शंकर माने, अमोल शेळके, शेख अर्षद सलीम मुलतानी जमीर देशमुख, जावेद देशमुख, काकासाहेब फरकाडे, ईश्वर कुंटे प्रकाश शिंदे, विजय काळे संतोष मिरगे, आबासाहेब जंजाळ, दिलीप पालोदे, खालेद पटेल, संजय येवले, उमेश सरोदे अमोल ढाकरे,ऋषींदर शिंदे, आदींसह नवनिर्वाचित सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य यांच्यासह भाजपा कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते

Show More

mh20live

आपल्या हक्काचे लोकप्रिय रोखठोक डिजिटल व्यासपीठ MH20LIve 🎥🖋️ mh20live चॅनल आपल्या हक्काचे चॅनल आपल्या भागातील ताज्या घडामोडी,संस्कृती, मनोरंजन व क्राइम बातम्या बघण्यासाठी www.mh20live.com आमच्या चॅनललाsubscribe करून घंटी समोरील बटन दाबा. mh20live Network अल्पावधीतच प्रसिद्धी मिळत असून महाराष्ट्रभर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे.संर्पक [email protected] MH20Live हे न्यूज पोर्टल mh20live Network Group यांनी प्रसारित केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे. औरंगाबाद न्याय कक्ष)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
Close
Close