Subscribe to our Newsletter
महाराष्ट्र

राज्यात ‘कोरोना’ वाढला तर जबाबदारी घेणार का? मुख्यमंत्र्यांनी केली भाजपवर टीका

मी तुमच्यावर नाराज आहे. अनेक लोक मास्क न घालता फिरत आहे. गर्दी करत आहेत. आपण शाळा उघडू शकलो नाही. निर्णय घेतला पण उघडू शकलो नाही, कारण प्रश्नांकित आहे. उद्या मुलं आजारी पडू नये याची काळजी आहे. काहीजण म्हणतात हे उघडा, ते उघडा, मात्र ते या महाराष्ट्राची जबाबदारी घेणार आहेत का?” असाही सवाल उद्धव ठाकरे यांनी विचारला.

“सर्व गोष्टी कायदे करुन होणार नाही, पण सावध राहा यानंतर येणारी कोरोनाची लाट नसून त्सुनामी असण्याची शक्यता”

https://www.facebook.com/dadajibhuseofficial/videos/848283095930934

मुंबई : दिवाळीनंतर कोरोना रुग्णांची संख्या पुन्हा एकदा वाढत आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रविवारी पुन्हा एकदा राज्यातल्या जनतेशी संवाद साधला. कोरोनाविरुद्धच्या लढ्यात नागरिकांनी खूप सहकार्य केलं असं मुख्यमंत्री म्हणाले. राज्यातल्या आरोग्य कर्मचाऱ्यांनी ज्या धीराने माझे कुटुंब, माझी जबाबदारी ही मोहिम राबवली त्याचं त्यांनी कौतुक केलं. रुग्ण संख्या आटोक्यात असली तरी धोका टळलेला नाही असंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. कोरोनाची दुसरी लाट ही लाटच नसून ती त्सुनामी असेल असा इशारीही त्यांनी दिला. राज्यात पुन्हा लॉकडाऊनची वेळ येवू नये असंही ते म्हणाले. आत्ताच कोरोनाचा अटकाव करा असंही ते म्हणाले. राज्यात हे उघडा ते उघडा अशी मागणी करणारे कोरोना वाढला तर जबाबदारी घेणार का? असा सवाल करत त्यांनी भाजपवर टीका केली.त्यामुळे नागरिकांनी निष्काळजीपणा करू नये असं आवाहनही त्यांनी केली. महाराष्ट्रात रात्रीचा कर्फ्यू लागू करा असं म्हणतात पण महाराष्टात आम्ही ठरवलेलं नाही. लोकांनीच नियम पाळावे असंही ते म्हणाले.मुख्यमंत्री म्हणाले, अनेक देशांमध्ये कोरोनाची दुसरी लाट आहे. काही राज्यांमध्ये रात्रीची संचारबंदी लागू करण्यात आली आहे. शाळा सुरू करण्याबाबात अजुनही काही ठरविण्यात आलेलं नाही असेही त्यांनी सांगितलं. मंदिरं उघडली मात्र तिथे गर्दी करू नका. अनावश्यक नसेल तिथे गर्दी करू नका. लक्षणे दिसत असेल तर लगेच चाचणी करून घ्या असंही ते म्हणाले.मास्क वापरा, वारंवार हात धुवा आणि सोशल डिस्टन्सिंगचं पालन करा असंही ते म्हणाले.

Show More

mh20live

आपल्या हक्काचे लोकप्रिय रोखठोक डिजिटल व्यासपीठ MH20LIve 🎥🖋️ mh20live चॅनल आपल्या हक्काचे चॅनल आपल्या भागातील ताज्या घडामोडी,संस्कृती, मनोरंजन व क्राइम बातम्या बघण्यासाठी www.mh20live.com आमच्या चॅनललाsubscribe करून घंटी समोरील बटन दाबा. mh20live Network अल्पावधीतच प्रसिद्धी मिळत असून महाराष्ट्रभर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे.संर्पक [email protected] MH20Live हे न्यूज पोर्टल mh20live Network Group यांनी प्रसारित केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे. औरंगाबाद न्याय कक्ष)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close