Subscribe to our Newsletter
राजकीय

एकनाथ खडसे यांच्या आदेशानेच मी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला- उदयसिंग पाडवी

जळगाव : भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्या राष्ट्रवादी प्रवेशाच्या चर्चा सुरु असताना माजी आमदार उदयसिंग पाडवी यांनी मोठा गौप्यस्फोट केलाय. खडसे यांच्या आदेशानेच मी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला आहे, असं सांगत राजकीय वर्तुळामध्ये त्यांनी एकच खळबळ उडवून दिली आहे.

एकनाथ खडसे राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याच्या बातम्या गेल्या अनेक दिवसांपासून येत आहेत. त्यातच आता माजी आमदार उदयसिंग पाडवी यांनी केलेल्या गौप्यस्फोटाने खडसेंचा राष्ट्रवादी प्रवेश जवळपास निश्चित झाला आहे, अशी चर्चा आता राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे.

राष्ट्रवादीत प्रवेश केलेले माजी आमदार उदयसिंह पाडवी म्हणाले, “ज्येष्ठ नेते आणि आमचे मार्गदर्शक एकनाथ खडसे यांच्या आदेशाने आणि सल्ल्याने मी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला”. एकनाथ खडसेंनी देखील आपण त्यांना राष्ट्रवादीत प्रवेश करण्यास सुचवलं असल्याचं मान्य केलं आहे. अनेक सहकारी आहेत, जे माझ्यावर विश्वास ठेवत पक्षांतर करतात, असं म्हणत खडसेंनी एकप्रकारे भाजपला इशाराच दिला आहे.

Show More

mh20live

आपल्या हक्काचे लोकप्रिय रोखठोक डिजिटल व्यासपीठ MH20LIve 🎥🖋️ mh20live चॅनल आपल्या हक्काचे चॅनल आपल्या भागातील ताज्या घडामोडी,संस्कृती, मनोरंजन व क्राइम बातम्या बघण्यासाठी www.mh20live.com आमच्या चॅनललाsubscribe करून घंटी समोरील बटन दाबा. mh20live Network अल्पावधीतच प्रसिद्धी मिळत असून महाराष्ट्रभर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे.संर्पक [email protected] MH20Live हे न्यूज पोर्टल mh20live Network Group यांनी प्रसारित केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे. औरंगाबाद न्याय कक्ष)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close