Subscribe to our Newsletter
Loading
क्रीडा व मनोरंजन

मी श्रध्दाला 8-9 वर्षं ओळखतो; पण आम्ही आयुष्यात प्रथमच एक-दोन प्रसंगांचं एकत्र

एकत्र चित्रीकरण केलं!”:‘तेरी मेरी इक जिंदरी’चा आध्विक महाजन म्हणतो,


‘तेरी मेरी इक जिंदरी’ या परस्परविरोधी स्वभावाच्या तरुणांमधील प्रेमकथा सादर करणार्‍्या मालिकेची घोषणा झी टीव्ही वाहिनीने अलीकडेच अमृतसरमधील एका पत्रकार परिषदेत केली होती. कारण या मालिकेचे कथानक अमृतसरमध्ये घडते. यात माही आणि जोगी या दोन तरूण जीवांची प्रेमकथा साकार होते. या दोघांचे स्वभाव परस्परविरोधी असले, तरी ते दोघे एकमेकांच्या प्रेमात पडतात, असे या मालिकेचे कथानक आहे. यात माहीची भूमिका टीव्हीवरील अभिनेत्री अमनदीप सिध्दू हिने साकारली आहे, तर जोगीच्या भूमिकेत आध्विक महाजन आहे.


छोट्या पडद्यावर भव्य प्रीमिअर होण्यापूर्वी या कलाकारांनी कुंडली भाग्यच्या सेटला भेट दिली. तिथे आध्विकची भेट त्याची जुनी मैत्रीण असलेल्या श्रध्दा आर्यशी झाली. ज्यांना ही गोष्ट फारशी ठाऊक नाही, त्यांना आम्ही सांगू इच्छितो की श्रध्दा आमि आध्विक यांची मैत्री सुमारे नऊ वर्षे जुनी आहे. या दोघांच्या एका समान मित्रामुळे त्यांची ओळख झाली आणि नंतर त्या दोघांमध्ये मैत्रीचे नाते वेगाने विकसित होत गेले. या दोघांच्या मैत्रीला आता जवळपास एक दशक होत आले असताना आध्विक आणि श्रध्दा हे प्रथमच एकत्र चित्रीकरण करीत होते.
बहिणी-बहिणीची शेती ! निसर्ग पुरक शेती :वाचा सविस्तर news


या अनुभवाविषयी आध्विक महाजन म्हणाला, “मी मुंबईत आलो तेव्हापासून मी श्रध्दाला ओळखतो. त्यामुळे आता आमच्या मैत्रीला 8-9 वर्षं सहज झाली आहेत. किंबहुना मुंबईत ज्यांच्याशी सर्वप्रथम माझी मैत्री झाली, त्यापैकी श्रध्दा ही पहिली असावी. आमच्या एका समान मित्राच्या लग्नात आमची प्रथम ओळख झाली आणि त्यानंतर आमच्यात मैत्रीचं नातं निर्माण झालं.

वाचा सविस्तर news सामान्‍य व्‍यक्‍तीच्‍या दृष्टिकोनावर आधारित नवीन मालिका ‘वागले की दुनिया – नयी पीढी, नये किस्‍से’

आता तर आम्ही जणू एकमेकांचे कौटुंबिक सदस्य असल्यासारखे वागतो. मी तिला जरी दीर्घकाळापासून ओळखत असलो, तरी आम्ही कधीच एका मालिकेत एकत्र नव्हतो. त्यामुळे इतक्या वर्षांनंतर प्रथमच आम्ही एकत्र चित्रीकरण करीत आहोत. खरं सांगायचं, तर तिच्याबरोबर चित्रीकरण करीत असताना आपण काम करीत आहोत, असं वाटतच नाही. श्रध्दाचं वागणं इतकं आशावादी असतं, की त्यामुळे सेटवर सर्वच जण आनंदी असतात. आमच्या या मालिकेबद्दल श्रध्दाने माझं अभिनंदन केलं. धीरज धूपर आणि श्रध्दा यांच्याबरोबर काम करतानाचा अनुभव फारच छान होता.”

वाचा सविस्तर news पोलीस दलातील महिला बीट अंमलदार जबाबदारीने आपले कर्तव्य पार पाडतील :गृहमंत्री अनिल देशमुख


श्रध्दा आर्य आणि आध्विक महाजन हे जरी सेटवर एकत्र आले असले, तरी जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन भिन्न स्वभावाचा असलेले दोन तरूण जीव एकमेकांच्या प्रेमात पडल्यावर काय घडते ते पाहा या नव्या मालिकेत.
पाहा ‘तेरी मेरी इक जिंदरी’ सोमवार ते शनिवार रात्री 8.00 वाजता फक्त ‘झी टीव्ही’वर!

वाचा सविस्तर newsमेरे देश की धरती’ चित्रपटात दिव्यांदू शर्मा हटके भूमिकेत

Show More

mh20live

आपल्या हक्काचे लोकप्रिय रोखठोक डिजिटल व्यासपीठ MH20LIve 🎥🖋️ mh20live चॅनल आपल्या हक्काचे चॅनल आपल्या भागातील ताज्या घडामोडी,संस्कृती, मनोरंजन व क्राइम बातम्या बघण्यासाठी www.mh20live.com आमच्या चॅनललाsubscribe करून घंटी समोरील बटन दाबा. mh20live Network अल्पावधीतच प्रसिद्धी मिळत असून महाराष्ट्रभर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे.संर्पक [email protected] MH20Live हे न्यूज पोर्टल mh20live Network Group यांनी प्रसारित केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे. औरंगाबाद न्याय कक्ष)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
Close
Close