Subscribe to our Newsletter
Loading
उद्योगधंदे आणि बिजिनेसदेशविदेश

भारतीयांच्या क्षमतेवर माझा विश्वास, देश पुन्हा विकासाच्या मार्गावर परतेल- नरेंद्र मोदी

नवी दिल्ली/mh20live

| सीआयआयला 125 वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या ऑनलाइन कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बोलताना भारतीयांच्या क्षमतेवर माझा विश्वास असल्याचं सांगत देश पुन्हा विकासाच्या मार्गावर परतेल, असा विश्वास व्यक्त केला.

भारताची क्षमता, प्रतिभा, टेक्नोलॉजी, संकट व्यवस्थापन, कल्पकता, शेतकरी आणि इंडस्ट्रीचे नेतृत्व करणाऱ्यांवर माझा पूर्ण विश्वास आहे. त्यामुळे भारत निश्चित विकासाच्या मार्गावर परतेल, असं नरेंद्र मोदी म्हणाले.

करोनामुळे आपला वेग कितीही धीमा झाला असला तरी, भारताने लॉकडाउनला मागे सोडून अनलॉक फेज १ मध्ये प्रवेश केला आहे. अर्थव्यवस्थेचा मोठा हिस्सा सुरु झाला आहे. आठ जूननंतर त्यामध्ये अधिक गती येईल, असं त्यांनी सांगितलं.

करोना व्हायरस विरुद्ध लढताना अर्थव्यवस्थेला पुन्हा बळकट करणे ही आमची सर्वोच्च प्राथमिकता आहे. त्यासाठी सरकारने तात्काळ आवश्यक पावले उचलली. दीर्घकाळाच्या दृष्टीने देशाच्या हिताचे ठरतील असे अनेक निर्णय घेतले आहेत, असं मोदींनी यावेळी सांगितलं.

Show More

mh20live

आपल्या हक्काचे लोकप्रिय रोखठोक डिजिटल व्यासपीठ MH20LIve 🎥🖋️ mh20live चॅनल आपल्या हक्काचे चॅनल आपल्या भागातील ताज्या घडामोडी,संस्कृती, मनोरंजन व क्राइम बातम्या बघण्यासाठी www.mh20live.com आमच्या चॅनललाsubscribe करून घंटी समोरील बटन दाबा. mh20live Network अल्पावधीतच प्रसिद्धी मिळत असून महाराष्ट्रभर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे.संर्पक [email protected] MH20Live हे न्यूज पोर्टल mh20live Network Group यांनी प्रसारित केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे. औरंगाबाद न्याय कक्ष)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
Close
Close