Subscribe to our Newsletter
Loading
औरंगाबाद

डॉक्टरांच्या अथक प्रयत्नामुळेच आज मी तुमच्या समोर शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी केला कोरोना योध्दांचा गौरव


संभाजीनगर दि. १ – जागतिक महामारी असलेल्या कोरोनाच्या संकट काळात गेल्या वर्षभरात आपल्या जीवाची पर्वा न करता अहोरात्र सेवा देणाNया डॉक्टरांचा शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांच्या वाढदिवसानिमित्त गौरव करण्यात आला. डॉक्टरांनी व आरोग्य कर्मचाNयांनी आपल्या कुटूंबियांपासुन दुर राहत लाखो लोकांचे कुटूंब वाचविले. यामुळे आजही मी केवळ डॉक्टरांच्या अथक प्रयत्नामुळेच तुमच्या समोर उभा आहे. लाखो लोकांचे प्राण वाचवणाNया डॉक्टरांचा आज मला सन्मान करण्याचे भाग्य लाभले यामुळे स्वतःला भाग्यवान समजतो. घाटी रुग्णालयाच्या अधिष्टाता डॉक्टर कानन येळीकर, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुंदरराव कुलकर्णी, महापालिकेचे आरोग्य अधिकारी डॉ. निता पाडळकर, सिग्मा हॉस्पीटलचे डॉ. उन्मेश टाकळकर, डॉ. मनीषा टाकळकर, डॉ. अजय रोटे, डॉ. मनीषा भट्टाचार्य, डॉ. ज्ञानेश्वर झाडे, डॉ. तुषार पाटील, डॉ. समित पटेल, धिरज तिवारी, अधिपरिचारिका अमृता दुबे आदींचा शाल, श्रीफळ व कोरोना योध्दा प्रमाणपत्र देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी अभिष्टचिंतन सोहळा समितीचे अ‍ॅड. आशुतोष डंख, महापौर नंदकुमार घोडेले, जयप्रकाश गुदगे, सोमनाथ साखरे, सचिन खैरे, ऋषिकेश खैरे, राजेंद्र जंजाळ, पंढरीनाथ गोंडे पाटील, सतीश जैन आदींनी परिश्रम घेतले. यावेळी महिला आघाडीच्या संपर्वâसंघटक कला ओझा, सहसंपर्वâसंघटक सुनिता आऊलवार, जिल्हा संघटक सुनिता देव, देवयानी सिमंत, अरुणा भाटी आदींची उपस्थिती होती.

Show More

mh20live

आपल्या हक्काचे लोकप्रिय रोखठोक डिजिटल व्यासपीठ MH20LIve 🎥🖋️ mh20live चॅनल आपल्या हक्काचे चॅनल आपल्या भागातील ताज्या घडामोडी,संस्कृती, मनोरंजन व क्राइम बातम्या बघण्यासाठी www.mh20live.com आमच्या चॅनललाsubscribe करून घंटी समोरील बटन दाबा. mh20live Network अल्पावधीतच प्रसिद्धी मिळत असून महाराष्ट्रभर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे.संर्पक [email protected] MH20Live हे न्यूज पोर्टल mh20live Network Group यांनी प्रसारित केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे. औरंगाबाद न्याय कक्ष)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
Close
Close