Subscribe to our Newsletter
Loading
क्रीडा व मनोरंजनलाईफ स्टाईल

पडद्यावर मी साकारत असलेल्या व्यक्तिरेखेसारखाच मी सुद्धा गुलजार साहेबांचा मोठा चाहता आहे: आशय मिश्रा

पडद्यावर मी साकारत असलेल्या व्यक्तिरेखेसारखाच मी सुद्धा गुलजार साहेबांचा मोठा चाहता आहे: आशय मिश्रा

मनमोकळ्या स्वभावाचा आणि आगळी प्रतिभा असलेला आशय मिश्रा सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवरील स्टोरी 9 मंथ्स की मालिकेत आलिया श्रॉफ (सुकीर्ती कांडपाल) च्या नायकाची, सारंगधर पांडेची भूमिका करत आहे. IVF (इन व्हिट्रो फर्टीलायझेशन) ची संकल्पना मुळाशी असलेली ही मालिका अशा दोन विरुद्धधर्मी व्यक्तिरेखांची कहाणी सांगते, जे दोघे अत्यंत भिन्न जगात वावरणारे आहेत आणि जेव्हा त्या दोघांचे मार्ग एकत्र येतात, तेव्हा त्यांचे जीवन कसे बदलते याचे चित्रण यात असणार आहे.

या मालिकेत सारंगधर हा मथुरेचा एक होतकरू लेखक आहे. जो वयाच्या तिसाव्या वर्षी आपल्या वडिलांच्या मर्जीविरुद्ध मुंबईत आपली कारकीर्द घडवण्यासाठी येतो. सारंगधरला लेखक बनायचे आहे आणि या मुंबई नगरीत आपले नाव कमवायचे आहे. भौतिक गोष्टींपेक्षा भावना त्याच्यासाठी अधिक मोलाच्या आहेत. तो शब्दप्रभू आहे आणि आपल्या चातुर्याने, वाणीने, शीघ्र काव्याने आणि शायरीने तो सहजगत्या लोकांना मोहित करतो. सारंगधरसाठी गुलजार साहब आणि त्यांचे लेखन प्रेरणास्वरूप आहे.

Show More

mh20live

आपल्या हक्काचे लोकप्रिय रोखठोक डिजिटल व्यासपीठ MH20LIve 🎥🖋️ mh20live चॅनल आपल्या हक्काचे चॅनल आपल्या भागातील ताज्या घडामोडी,संस्कृती, मनोरंजन व क्राइम बातम्या बघण्यासाठी www.mh20live.com आमच्या चॅनललाsubscribe करून घंटी समोरील बटन दाबा. mh20live Network अल्पावधीतच प्रसिद्धी मिळत असून महाराष्ट्रभर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे.संर्पक [email protected] MH20Live हे न्यूज पोर्टल mh20live Network Group यांनी प्रसारित केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे. औरंगाबाद न्याय कक्ष)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
Close
Close