बारावीच्या परीक्षेत सुंदरराव सोळंके महाविद्यालयाच्या निकालाची उज्वल परंपरा कायम
माजलगाव /रविकांत उघडे
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या बारावीच्या निकाल जाहीर झाला असुन यामध्ये सुंदरराव सोळंके महाविद्यालयाने निकालाची उज्वल परंपरा कायम ठेवली आहे.यामध्ये विज्ञान शाखाचा ९६.८८ टक्के,
कला शाखाचा ७७.३२ टक्के, वाणिज्य शाखाचा ९५.६५ टक्के,व्यवसायिक अभ्यासक्रम १०० टक्के निकाल लागला आहे.
बारावीच्या परीक्षेत सुंदराव सोळंके महाविद्यालयातील विज्ञान शाखेतुन
प्रथम कुलकर्णी आदिनाथ बालासाहेब (८९.८३%), द्वितीय गायके सुमित प्रदीपराव (८८.६७%), तृतीय जाधव हर्षदा हरिभाऊ (८७.१६%)
कला शाखातुन प्रथम कोरडे संकेत अभिमन्यू(८८%) , द्वितीय शेख नंमरिन आरा (८३.६६%),
तृतीय रिंगने सुरज दगडोबा (८१.५०%)
वाणिज्य शाखातुन
प्रथम कदम करण शिवाजीराव ( ८८.३३%), द्वितीय ठोंबरे सुबोध ज्ञानोबा (८६%),
तृतीय गिरी वैष्णवी जगन्नाथ (८४.८३%)
व्यवसायिक अभ्यासक्रमातुन
प्रथम तौर रूपाली दत्तात्रय (७९.१७%), COHS, द्वितीय नरवटे तुकाराम रंगनाथ Auto, (७५.८३%), तृतीय भिसे पवन किसनराव Ele. (७५.१७%) यांनी यश संपादन केले आहे.
उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे म शि. प्र. मंडळाचे अध्यक्ष आ.प्रकाश सोळंके यांच्यासह विकास समिती सदस्य ऍड. भानुदास डक, सत्यप्रकाश रुद्रवार, डॉ बी. एल.चव्हाण,प्राचार्य डॉ. जी. के.सानप, उपप्राचार्य प्रकाश गवते, उपप्राचार्य पवन शिंदे,उपप्राचार्य प्रा डॉ एन. के. मुळे, उपप्राचार्य प्रा.डॉ. एम. ए. कव्हळे,प्रबंधक प्रशांत चव्हाण, अधिक्षक सतीश एरंडे यांनी अभिनंदन केले.