Subscribe to our Newsletter
Loading
महाराष्ट्रशेतीविषयक

भेंडीबाजारातील महिला शेतकरी कशा ? मोर्चात शेतकरी कमी आणि घुसवलेले लोक जास्त

विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकरांची शेतकरी मोर्चावर घणाघाती टीका

मुंबई : विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी आज आझाद मैदान येथील शेतकरी मोर्चावर घणाघाती टीका केली आहे. भेंडी बाजारात कुठून आले शेतकरी? या आंदोलनात शेतकरी कमी आणि इतर लोकच जास्त घुसवली, अशी टीका प्रवीण दरेकर यांनी केली आहे.

दिल्लीतील शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आज आझाद मैदानात हजारो शेतकरी जमले. या मोर्चाला राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरातही उपस्थित होते. या मोर्चामध्ये हजारो शेतकरी सहभागी झाले होते. मात्र, या मोर्चावरून प्रवीण दरेकर यांनी टीका केली आहे. या आंदोलनात इतर लोक घुसवली आहेत. इथली लोकं शेतकरी म्हणून आंदोलनात घुसली. भेंडीबाजारात कुठून आलेत शेतकरी? असा सवाल दरेकर यांनी केला. आंदोलनाला प्रतिसाद मिळत नसल्यानेच अशा प्रकारची गर्दी गोळा करण्याची आघाडीवर वेळ आल्याची टीकाही त्यांनी केली.

शिवसेनेचा एकही नेता या आंदोलनात सहभागी नव्हता, त्यावरूनही दरेकरांनी टीका केली. आजच्या आंदोलनाने शिवसेनेला भूमिकाच नाही हे स्पष्ट झालेय. आता रोखठोक भूमिका घेणारी शिवसेना उरलेली नाही. शरद पवारांनी मुख्यमंत्र्यांना मोर्चात येऊ नको म्हणून सांगितले. पवारांचा हा सल्ला समजायला वेळ आहे. त्यामुळे मुख्यमंत्रीच सोडा पण शिवसेनेचा एकही नेता या आंदोलनाकडे फिरकला नाही, असेही ते म्हणाले. केंद्रातील मोदी सरकार हे शेतकऱ्यांच्या हिताचे सरकार आहे. परंतु काही राजकीय पक्ष त्यांचे राजकीय अस्तित्व टिकवण्यासाठी शेतकऱ्यांना पुढे करत आहेत, असा टोलाही त्यांनी लगावला.

Show More

mh20live

आपल्या हक्काचे लोकप्रिय रोखठोक डिजिटल व्यासपीठ MH20LIve 🎥🖋️ mh20live चॅनल आपल्या हक्काचे चॅनल आपल्या भागातील ताज्या घडामोडी,संस्कृती, मनोरंजन व क्राइम बातम्या बघण्यासाठी www.mh20live.com आमच्या चॅनललाsubscribe करून घंटी समोरील बटन दाबा. mh20live Network अल्पावधीतच प्रसिद्धी मिळत असून महाराष्ट्रभर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे.संर्पक [email protected] MH20Live हे न्यूज पोर्टल mh20live Network Group यांनी प्रसारित केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे. औरंगाबाद न्याय कक्ष)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
Close
Close