Subscribe to our Newsletter
Loading
औरंगाबाद

गृहमंत्री अनिल देशमुख यांचा औरंगाबाद दौरा कार्यक्रम

गृहमंत्री अनिल देशमुख यांचा औरंगाबाद दौरा कार्यक्रम

औरंगाबाद, दिनांक 28 : गृहमंत्री महाराष्ट्र राज्य अनिल देशमुख यांचा औरंगाबाद दौरा खालील प्रमाणे राहील.शुक्रवार दिनांक 29 जानेवारी रोजी सकाळी 8.50 वा. विमानाने औरंगाबादकडे प्रयाण. सकाळी 9.50 वा. औरंगाबाद येथे आगमन व मोटारीने शासकीय विश्रामगृह औरंगाबादकडे प्रयाण. सकाळी 10.10 ते 11.30 पर्यंत शासकीय विश्रामगृह, औरंगाबाद येथे राखीव. सकाळी 11.30 वा. शासकीय विश्रामगृह येथून दैनिक लोकमत कार्यालय, औरंगाबादकडे प्रयाण. दुपारी 12.30 वा. दैनिक लोकमत कार्यालय येथून हॉटेल अजिंठा ॲम्बेसेडर, औरंगाबादकडे प्रयाण. दुपारी 12.40 वा. हॉटेल अजिंठा ॲम्बेसेडर, सिडको, जालना रोड औरंगाबाद येथे आगमन व राखीव. दुपारी 2 वा. सन 2020 चे वि. स. वि. क्रमांक-51 शक्ती फौजदारी कायदे (महाराष्ट्र सुधारणा) विधेयक, 2020 यावरील संयुक्त समितीची महिला संघटनेच्या प्रतिनिधी समवेत बैठक.

हेही वाचा-औरंगाबाद तालुक्यातील सरपंच पदाच्या आरक्षणाचीउद्या सोडत

दुपारी 4 वा. सन 2020 चे वि. स. वि. क्रमांक-51 शक्ती फौजदारी कायदे (महाराष्ट्र सुधारणा) विधेयक, 2020 यावरील संयुक्त समितीची औरंगाबाद खंडपिठाच्या तसेच जिल्हा सत्र न्यायालयाच्या वकील संघटनांच्या प्रतिनिधी समवेत बैठक (स्थळ:- दिवाण ई खास हॉल, हॉटेल अजिंठा ॲम्बेसेडर, सिडको, जालना रोड औरंगाबाद.) सायं 6 वा. पोलीस अधीक्षक कार्यालय, (ग्रामीण) औरंगाबादकडे प्रयाण. सायं 6.10 ते 6.40 पर्यंत पोलीस अधीक्षक कार्यालय, (ग्रामीण) औरंगाबाद येथे भेट (महिला बीट मार्शल) व नंतर पोलीस आयुक्त कार्यालय, औरंगाबादकडे प्रयाण. सायं 7 ते 8 पर्यंत पोलीस आयुक्त कार्यालय, औरंगाबाद येथे वरीष्ठ पोलीस अधिकाऱ्यांसमवेत आढावा बैठक. रात्रौ 8 वा. पोलीस आयुक्त कार्यालय, औरंगाबाद येथून शासकीय विश्रामगृह औरंगाबादकडे प्रयाण. रात्रौ 8.15 ते 9.15 पर्यंत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मा. लोकप्रतिनिधी, पदाधिकारी / अभ्यागतांकरिता राखीव व मुक्काम.शनिवार दिनांक 30 जानेवारी रोजी सकाळी 9.10 वा. शासकीय विश्रामगृह, औरंगाबाद येथून औरंगाबाद विमानतळाकडे प्रयाण. सकाळी 9.30 वा. औरंगाबाद विमानतळ येथे आगमन व राखीव. सकाळी 10.20 वा. औरंगबाद विमानतळ येथून  विमानाने मुंबईकडे प्रयाण.

Show More

mh20live

आपल्या हक्काचे लोकप्रिय रोखठोक डिजिटल व्यासपीठ MH20LIve 🎥🖋️ mh20live चॅनल आपल्या हक्काचे चॅनल आपल्या भागातील ताज्या घडामोडी,संस्कृती, मनोरंजन व क्राइम बातम्या बघण्यासाठी www.mh20live.com आमच्या चॅनललाsubscribe करून घंटी समोरील बटन दाबा. mh20live Network अल्पावधीतच प्रसिद्धी मिळत असून महाराष्ट्रभर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे.संर्पक [email protected] MH20Live हे न्यूज पोर्टल mh20live Network Group यांनी प्रसारित केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे. औरंगाबाद न्याय कक्ष)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
Close
Close