Subscribe to our Newsletter
Loading
राजकीय

राज्यपालांच्या इंग्रजी पत्राला मुख्यमंत्र्यांनी ठाकरी भाषेत दिलेले उत्तर ऐतिहासिक दस्ताऐवज आहे – संजय राऊत

मुंबईः महाराष्ट्रातील मंदिरे भाविकांच्या दर्शनासाठी खुली करावीत, या मागणीसाठी भाजपनं राज्यात आंदोलन सुरु केलं आहे. याच, पार्श्वभूमीवर राज्यपालांनीही मंदिरांबाबत मुख्यमंत्रांना पत्र धाडलं आहे. या पत्राला, मुख्यमंत्र्यांनी यांनी ठाकरे स्टाइलमध्ये उत्तर दिलं आहे. ‘माझ्या हिंदुत्वाला आपल्या प्रमाणपत्राची आवश्यकता नाही. तसेच ते कोणाकडून शिकण्याचीही मला गरज नाही,’ असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे.’ तसंच, ‘माझ्या राज्याला अथवा माझ्या राज्याच्या राजधानीला पाकव्याप्त काश्मिर म्हणणाऱ्यांचे हसत खेळत घरात स्वागत करणे हेही माझ्या हिंदुत्वात बसत नाही,’ असा कंगनाला अप्रत्यक्षपणे टोला लगावला आहे.

फॅशन क्लिअरन्स स्टोअरमध्ये ७० टक्क्यांपर्यंत सूट
असा प्रश्न आपल्याला का पडावा? केवळ धर्मस्थळे उघडणे म्हणजे हिंदुत्व आणि नउघडणे म्हणजे सेक्युलर असे आपले म्हणणे आहे का? मग आपण राज्यपालपदाची शपथ ज्या घटनेनुसार घेतलीत त्या घटनेचा महत्वाचा गाभा आहे तो आपल्याला मान्य नाही का?,’ असा सवाल मुख्यमंत्र्यांनी या पत्रात उपस्थित केला आहे.

‘इतर राज्यांत, देशात बरे वाईट काय घडते आहे ते बघत माझ्या महाराष्ट्रात चांगले कसे करता येईल ते करण्याचा प्रामाणिक प्रयत्न मी करतो आहे. आपण म्हणता गेल्या ३ महिन्यात काही शिष्टमंडळांनी भेटून आपल्याला प्रार्थनास्थळे उघडण्याबद्दल विनंती केली, त्यातील ३ पत्रे आपण सोबत जोडली आहेत. हि तिनही पत्रे भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकारी आणि समर्थकांची आहेत. हा योगायोग असू शकतो. असो आपल्या विनंतीचा महाराष्ट्र सरकार गांभिर्याने विचार करत असून सर्व काळजी घेवून लवकरात लवकर याबाबत निर्णय घेतला जाईल हि खात्री मी आपल्याला देतो,’ असा खोचक टोला मुख्यमंत्र्यांनी राज्यपालांना लगावला आहे.

Show More

mh20live

आपल्या हक्काचे लोकप्रिय रोखठोक डिजिटल व्यासपीठ MH20LIve 🎥🖋️ mh20live चॅनल आपल्या हक्काचे चॅनल आपल्या भागातील ताज्या घडामोडी,संस्कृती, मनोरंजन व क्राइम बातम्या बघण्यासाठी www.mh20live.com आमच्या चॅनललाsubscribe करून घंटी समोरील बटन दाबा. mh20live Network अल्पावधीतच प्रसिद्धी मिळत असून महाराष्ट्रभर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे.संर्पक [email protected] MH20Live हे न्यूज पोर्टल mh20live Network Group यांनी प्रसारित केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे. औरंगाबाद न्याय कक्ष)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
Close
Close