Subscribe to our Newsletter
Loading
महाराष्ट्र

रस्त्यावर चालता बोलता मदतीचा हात देणारा -महामार्ग साहयक.पोलीस निरीक्षक नामदेव चव्हाण

MH20LIVE NETWORK

कन्नड / कल्याण पाटील

डोंगर दर्याच्या कुशीत ग्रामीण भागात गरिबी परिस्थितून प्राथमिक शिक्षण पूर्ण करून माध्यमिक शिक्षणासाठीच घर सोडून आईडिलांपासून दूर राहत महाविद्यालयीन आणि पदवी चे शिक्षण स्वावलंबनाने पूर्ण करणारा नामदेव चव्हाण पोलीस खात्यात शिपाई म्हणून रुजू झाला आणि बालपणापासून घेतलेली मेहनत फळाला आली.ग्रामीण भागाची नाळ,गरीब परिस्थितीची जाण, बालपणापासून  स्वावलंबन,सवंगड्यांचीही परिस्थितीची जाणीव असलेल्या नामदेव चव्हाण शिक्षणासोबत व्यावहारि क शिक्षणही अनुभवातून शिकत होता.1984 साली शिपाई म्हणून पोलीस दलात दाखल झालेला नामु आता नामदेवराव झाला दोनाचे चार हात झाले मात्र लहानपणापासून कोणत्याही परिस्थितीत सतत प्रसन्न आणि दुसऱ्यांच्या मदतीला धावून जाण्याची त्याची सवय त्यातील माणूसपण सतत कार्यरत होते.जेथे असेल तेथे आजूबाजूला जर काही मदत लागेल कुणालाही काहीही हवं असेल तर नामदेवराव तितकाच तत्पर असतो.शिपाई पदावरून नामदेवराव ची बढती होऊन आता कॉन्स्टेबल बनला.प्रमोशन बढती झाली तशी त्यांची इतरांना गरजूंना मदत करण्याची प्रवृत्ती  वाढतच राहिली.  आपला सहज स्वभाव मदत करण्याची प्रवृत्ती आणि मदतीचा कुठलाही आविर्भाव नसलेला हा सद्गृहस्थ पोलीस दलात असूनही सतत दैनिक कामात कुणाच्या ना कुणाच्या मदतीला सहज उपलब्ध असतो. सन    2004 साली पोलीस उपनिरीक्षक म्हणून बढती झल्यांनातर सन  2017 साली महामार्ग सहाय्यक पोलीस निरीक्षक पदी म्हणून खुलताबाद केंद्र   रुजू झाला.   महामार्गावरील पोलीस शिपाई ते अधिकारी पांढरे पोशाख परिधान  करून गाड्या अडविणे आणि त्यांचे बरेच प्रकार आणि त्यांच्या कथा सर्वश्रुत आहे मात्र हा अवलिया रस्त्याने फिरतो दिसतो तो एका वेगळ्याच विश्वात.कधी लांब पल्ल्याचीजड वाहतूक करणारे वाहन नादुरुस्त झाले तर ताबडतोब तेथे जाऊन त्यांना चहा पाणी पासून तर अगदी स्वतःचा जेवणाचा डब्बा त्यांना देणारा ,अपघात झाला असेल तर तात्काळ सर्व यंत्रणा राबवून स्वतः हॉस्पिटल पर्यंत  नेऊन सोडणारा हा सच्चा पोलीस,रात्री अपरात्री सतत गरजूंना मदतीसाठी दत्त म्हणून हा अवलिया प्रसन्न मुद्रेने जेंव्हा चिंतातुर चेहऱ्यांना भेटतो तेंव्हा पोलिस म्हणून जवळ जातो तोपर्यंत त्यांच्या मनातील पोलिसांबद्दल चे मळभ सहज गळून पडलेले असते आणि या अवलीयच्या या स्वरूपाने तशाही चिंतातुर वातावरणात त्यांना आल्हाददायक वाटायला लागते.प्रसूतीसाठी दवाखान्यात जाणाऱ्या आणि ऐनवेळी दवाखान्यात पोहचण्यापूर्वीच प्रसूती साठी इतर प्रवासी महिलांना थांबवून तेथेच सर्व व्यवस्था करायला लावताना हात जोडून विनवणी करताना हा अवलिया स्वतःक धन्य मानतो.चालता बोलता सुहृद्य माणुसकीचा झराच जेंव्हा त्रासलेल्या भुकेल्या अपघातग्रस्तांना प्रसव वेदनेच्या काळात जेंव्हा भेटतो तेंव्हा त्याचे जे नाते बनते ते केवळ आणि केवळ न विसरण्यासाठी त्यांचे तर क्षण आयुष्यभरासाठी हृदयाच्या कोपऱ्यात कायम स्वरूपी कोरले जातात.पोलीस दलात कार्यरत असलेला हा माणुसकीचा जिवंत झरा खऱ्या अर्थाने पोलीस जगतो जगवतो आणि जगवितो.,अनेकांच्या मदतीला तत्पर असणारा अनेकांना वेळेवर मदत दिल्याने त्यांचे प्राण वाचविणारा आणि अनेकांना रस्त्यावर प्रसव वेदनेने व्याकुळ असह्य त्या महिला आणि त्यांच्या कुटुंबियांना आधार देऊन तेथेच गोंडस बाळ जेंव्हा कण्हण्याचा आवाजाणे आकाश हेच छत आणि जमिन हेच घर असणाऱ्यांच्या जीवनात आनंदाचे तुषार सिंचन पसरवतो असा हा अवलिया दररोज अशाच थाटात नव्या दमाने तितक्याच प्रसन्नतेने मदतीसाठी हजर असतो.कधीही आपण किती जणांना मदर केली आणि करतो याचा जराही अविर्भाव याच्या चेहऱ्यावर नसतो तेंव्हा हा माणूस अजूनच मोठा धास्ती.त्यामुळेच या अवलीयबद्दल सहज शब्द आठवतात
जरुरी नही की हर वक्त जुबां पर खुदा का नाम आये ,ओ लम्हा भी इबादत का होता है जब इंसान किसी के काम आता है

Show More

mh20live

आपल्या हक्काचे लोकप्रिय रोखठोक डिजिटल व्यासपीठ MH20LIve 🎥🖋️ mh20live चॅनल आपल्या हक्काचे चॅनल आपल्या भागातील ताज्या घडामोडी,संस्कृती, मनोरंजन व क्राइम बातम्या बघण्यासाठी www.mh20live.com आमच्या चॅनललाsubscribe करून घंटी समोरील बटन दाबा. mh20live Network अल्पावधीतच प्रसिद्धी मिळत असून महाराष्ट्रभर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे.संर्पक [email protected] MH20Live हे न्यूज पोर्टल mh20live Network Group यांनी प्रसारित केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे. औरंगाबाद न्याय कक्ष)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
Close
Close