Subscribe to our Newsletter
Loading
औरंगाबाद

शिवस्मारकांसह कोरोना योद्ध्यांवर हेलिकॉप्टरने पुष्पवृष्टी

खुलताबाद –तालुक्यातील बाजार सावंगी येथे गुरुवारी छत्रपती शिवाजी महाराजांच्या 391 व्या जयंतीनिमित्त औरंगाबाद जिल्ह्यातील 140 शिव छत्रपतींच्या स्मारकावर तसेच कोरोना महामारीच्या काळात लढलेल्या आरोग्य, पोलीस, व इतर कर्मचारी तसेच कोरोना योद्ध्यांना मानवंदना म्हणून शिवछत्रपती पुतळा व गावांवर हेलिकॉप्टरद्वारा पुष्पवृष्टी करण्यात आली.
या कार्यक्रमात बाजार सावंगी तालुका खुलताबाद येथील छत्रपती युवा प्रतिष्ठान व शिवशंभू संघटनेचा समावेश असल्याने बाजार सावंगीच्या बाजारपेठेतील शिवछत्रपतींच्या पुतळ्यास आर. आर. पाटील फाउंडेशन व समस्त शिवभक्त औरंगाबाद यांच्या वतीने दि. 18 फेब्रुवारी रोजी दुपारी दीड ते दोनच्या दरम्यान धावत्या हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी करण्यात आली. यावेळी समस्त ग्रामस्थांनी टाळ्या वाजवून स्वागत केले.
शिवरायांच्या स्मारकावर हेलिकॉप्टरद्वारा पुष्पवृष्टी होणार असल्याचे बुधवारी प्रत्यक्ष पाहणीने संपूर्ण ग्रामस्थांमध्ये उत्साहाचे व आनंदाचे वातावरण होते. सकाळपासून मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित राहून पुष्पवृष्टीची प्रतीक्षा करीत होते. दुपारी हेलिकॉप्टरचा आवाज येताना व प्रत्यक्षात पुष्पवृष्टी पाहून शिवछत्रपतींच्या जयघोषाने परिसर दुमदुमला होता. पुष्पवृष्टी होताच संघटना अध्यक्ष व पदाधिकारी संजय नलावडे, जानकीराम नलावडे, योगेश नलावडे, आकाश जाधव, जयदीप नलावडे, गणेश नलावडे, कृष्णा नलावडे, अक्षय नलावडे, कल्याण काटकर, कपिल ढेपले, दिपक दहातोंडे, संजय आवटे आदींनी शिवरायांचा जयघोष करीत परिसर दणाणून सोडला.

Show More

mh20live

आपल्या हक्काचे लोकप्रिय रोखठोक डिजिटल व्यासपीठ MH20LIve 🎥🖋️ mh20live चॅनल आपल्या हक्काचे चॅनल आपल्या भागातील ताज्या घडामोडी,संस्कृती, मनोरंजन व क्राइम बातम्या बघण्यासाठी www.mh20live.com आमच्या चॅनललाsubscribe करून घंटी समोरील बटन दाबा. mh20live Network अल्पावधीतच प्रसिद्धी मिळत असून महाराष्ट्रभर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे.संर्पक [email protected] MH20Live हे न्यूज पोर्टल mh20live Network Group यांनी प्रसारित केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे. औरंगाबाद न्याय कक्ष)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
Close
Close