Subscribe to our Newsletter
Loading
मराठवाडा

अंबाजोगाई तालुक्यात जोरदार पर्जन्यवृष्टी:शेतांना तलावाचे स्वरूप


अंबाजोगाई /राहुल देशपांडे

 गत २४ तासात अंबाजोगाई तालुक्यात जोरदार पर्जन्यवृष्टी झाली असून शेतांना तलावाचे स्वरूप प्राप्त झाले आहे. अंबाजोगाई तालुक्यातील नुकसानप्रचंड आहे. रस्ते पाण्याखाली गेले आहेत, बंधारे फुटले आहेत. पुले वाहून गेली आहेत. धरणे खचाखच भरली आहेत. नद्यांनी पात्र बदलले आहेत. ग्रामस्थांना वाचवण्यासाठी एनडीआरएफ बोटसहित तैनात करण्यात आले आहेत.सोमवारी रात्रभर झालेल्या जोरदार पावसाने तालुका जलमय झाला आहे. सर्वत्र भीतीदायक वातावरण निर्माण झाले आहे. मध्यरात्रीपासूनच मांजरा धरणाचे सहा दरवाजे तीन मीटरने उघडण्यात पुरवठा खंडीत झाला. धरणस्थळी मोठा आवाजही झाला. जनरेटरच्या मदतीने दरवाजे उघडण्याचा प्रयत्न झाला. रात्री एक वाजता विद्युत पुरवठा सुरळीत झाल्यानंतर तब्बल १८ दरवाजे उघडण्यात आले. ७० हजार क्युसेकने पाण्याचा विसर्ग केला जात आहे. अंबाजोगाई, तालुक्यातील अनेक गावांना पाण्याने वेढा दिला आहे. तालुक्यातील तडोळा गावात शिरले आहे. आपेगावातील लोकांना सुरक्षित स्थळी नेण्यासाठी एनडीआरएफचे जवान बोटसहित दाखल झाले आहेत. लातूरहूनही जादा कुमक मागवण्यात आले आहे. देवळा सह काही गावांना वेढा दिला आहेतालुक्यातील आपेगाव येथे मांजरा नदीला आलेल्या महापुरामुळे शेतात पाणी घुसून पुरुष, महिला व लहान बालके असे १८ व्यक्ती शेतात असलेल्या घराच्या स्लॅब वर अडकले होते.आ.नमिता मुंदडा यांनी जिल्हाधिकाऱ्यांना माहिती देऊन रेस्क्यू टीम पाठ विण्याचे सांगितले होते. त्यानुसार बीड येथून आलेल्या रेस्क्यू टीमने पाण्यात अडकलेल्या लोकांसह जनावरांना सुखरूप बाहेर काढले.धनेगाव येथील मांजरा धरणाचे सर्व दरवाजे उघडल्याने धरणाच्या खाली असलेल्या गावात महापूर आलेला आहे. त्याचा सर्वात जास्त फटका आपेगाव ला बसला आहे. या पुराच्या पाण्यात अर्धे आपेगाव गेले आहे.  कुटुंब पाण्यात अडकले होते. शेतातील सालगडी व त्यांचे कुटुंब असे अनेक पुरुष, महिला व लहान बालके शेतात असलेल्या घराच्या स्लॅपवर बसले होते. त्यांची रेस्क्यु टिम ने सुखरूप सुटका केली.नदीकाठच्या गावात पाणी शिरले असून पावसाच्या पाण्याने  शेतीसह इतर मालमत्तेचे प्रचंड नुकसान झाले असल्याचे सद्य स्थितीमधून दिसून येत आहे पावसाने  प्रचंड नुकसान केले आहे. शेत जमिनी वाहून गेल्या आहेत. काही जणांची जनावरे दगावली, वाहून गेली. सर्व बाजुनी रस्ते बंद झाले आहेत, संपर्क व्यवस्था तुटली आहे. नद्या धोक्याच्या पातळी पेक्षा बऱ्याच ऊंचीवरून वहात आहेत. काढणीला आलेले सोयाबीन सारखे पीक उभे असताना कोंब फुटायला लागलेत. अद्रक, ऊस, अशा अनेक पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे.

Show More

mh20live

आपल्या हक्काचे लोकप्रिय रोखठोक डिजिटल व्यासपीठ MH20LIve 🎥🖋️ mh20live चॅनल आपल्या हक्काचे चॅनल आपल्या भागातील ताज्या घडामोडी,संस्कृती, मनोरंजन व क्राइम बातम्या बघण्यासाठी www.mh20live.com आमच्या चॅनललाsubscribe करून घंटी समोरील बटन दाबा. mh20live Network अल्पावधीतच प्रसिद्धी मिळत असून महाराष्ट्रभर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे.संर्पक [email protected] MH20Live हे न्यूज पोर्टल mh20live Network Group यांनी प्रसारित केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे. औरंगाबाद न्याय कक्ष)

Related Articles

Back to top button
Close
Close