Subscribe to our Newsletter
Loading
लाईफ स्टाईल

जेवनानंतर बडीशेप खाण्याचे आरोग्यदायी फायदे

जेवनानंतर बडीशेप खाण्याचे आरोग्यदायी फायदे


बडीशेपमध्ये फायबर, फॉस्फरस, सेलेनियम, झिंक, मँगनिझ, कोलाईन, बीटा कॅरोटीन असे अँटी-ऑक्सिडंटस् मोठ्या प्रमाणावर असतात, हे शरीराचे ‘फ्री रॅडीकल्स’ पासून रक्षण करतात. यामुळे पचनक्रिया सुरळीत राहून पोटाच्या आजाराशी निगडीत तक्रारी दूर होण्यास मदत होते. बडीशेपमध्ये असे अनेक गुण आहेत जे आरोग्यासाठी फायदेशीर आहेत. चला तर जाणुन घेउयात बडीशेप खाण्याचे आरोग्यदायी फायदे

बडीशेपमध्ये भरपूर प्रमाणात पोटॅशिअम असतं, जे शरीरासाठी आवश्यक असतं. हे रक्तवाहिन्यांना लवचिक बनवतं. ज्यामुळे तुमचं ब्लड प्रेशर नियमित राहतं.

दररोज जेवणानंतर एक चमचा बडीशेप आणि खडीसाखर सेवन केल्यास स्मरणशक्ती वाढते. बडीशेप खाण्याने आपली पाचन शक्ती मजबूत होते, जेणेकरून आपल्यास बद्धकोष्ठतेची समस्या उद्भवत नाही. पोटाचे विकार दूर करण्यासाठी बडीशेप खाल्यास फायदा होतो.

बडीशेप खाण्याने तोंडाला येणारी दुर्गंधी कमी होते. वजन कमी करण्यासाठी कपभर पाण्यात एक चमचाभर बडीशेप घालून उकळून घ्या आणि हे पाणी दिवसातून दोन ते तीन वेळा प्या. यामुळे वजन कमी होण्यासही मदत होईल.

बडीशेपेमध्ये फायबर, अँटी-ऑक्सिडंटस्, क्षार मोठ्या प्रमाणावर असून, ही तत्वे वजन नियंत्रणामध्ये ठेवण्यास सहायक असतात. खोकला येत असल्यास थोडीशी बडीशेप जेवानानंतर खाल्ली तर फरक पडतो. खोकल्यावर बडीशेप मधात मिक्स करून दिवसातून दोन ते तीन वेळा चावून खाल्ल्यास खोकला कमी होण्यास मदत होईल.

पोटात दुखत असल्यास भाजलेली बडीशेप खाल्ल्यास फरक पडतो. आपल्याला बडीशेप खाण्याचे आरोग्यदायी फायदे ही माहिती कशी वाटली हे कमेन्ट करून आम्हाला नक्की सांगा अशीच वेगवेगळ्या विषयावरील माहिती वाचण्यासाठी आमचे फेसबुक पेज लाइक करा.

Show More

mh20live

आपल्या हक्काचे लोकप्रिय रोखठोक डिजिटल व्यासपीठ MH20LIve 🎥🖋️ mh20live चॅनल आपल्या हक्काचे चॅनल आपल्या भागातील ताज्या घडामोडी,संस्कृती, मनोरंजन व क्राइम बातम्या बघण्यासाठी www.mh20live.com आमच्या चॅनललाsubscribe करून घंटी समोरील बटन दाबा. mh20live Network अल्पावधीतच प्रसिद्धी मिळत असून महाराष्ट्रभर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे.संर्पक [email protected] MH20Live हे न्यूज पोर्टल mh20live Network Group यांनी प्रसारित केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे. औरंगाबाद न्याय कक्ष)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
Close
Close