Subscribe to our Newsletter
Loading
क्राईम

वडीगोद्रीजवळ धावत्या कारने घेतला पेट राष्ट्रीय महामार्गावर पाच जणांसह, बाळ सुखरुप

अंबड :अंबड तालुक्यातील वडीगोद्री जवळील धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर रविवारी सायंकाळी सात वाजेच्या सुमारास भरधाव वेगाने धावणार्‍या स्कॉर्पिओने अचानक पेट घेतला. सुदैवाने गाडीतील पाच सदस्यांसह दोन महिन्याचे बाळ बालंबाल बचावले.याबाबत माहिती अशी की,वडीगोद्रीजवळ केज (जि. बीड ) येथील रहिवासी खलील इनामदार आपल्या कुटूंबातील पाच सदस्यांसह केजवरून औरंगाबादकडे स्कारपीओ गाडीने जात होते.तेव्हा या स्कारपीओ गाडीमधून अचानक समोरून इंजिनमधून धूर निघत असल्याचे लक्षात आले.तेव्हा खलील इनामदार यांनी गाडी थांबवून गाडीचे इंजिन तपासण्यासाठी गाडीचे बोनेट उघडले असता इंजिनने अचानक पेट घेतला.तेव्हा खलील इनामदार व त्यांच्या कुटुंबातील सदस्यांनी माती टाकून पेटलेली गाडी विजवण्याचा प्रयत्न केला.परंतु गाडीने जास्त पेट घेतल्यामुळे गाडी विजवण्याचे प्रयत्न निष्फळ ठरले. तेव्हा खलील इनामदार व त्यांच्या कुटुंबातील सदस्य यांनी तिथून पळ काढला.गाडीतील साहित्य व कागदपत्रे काढण्यास वेळ मिळाला नाही.ती सर्व साहित्य व कागदपत्रे गाडीबरोबर जळून खाक झाली.तसेच जमलेल्या नागरिकांनी गाडी विजवण्याचा प्रयत्न केला.परंतु गाडी विजवण्यास यश आले नाही. या घटनेची माहिती मिळताच गोंदी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शिलतकुमार बल्लाळ यांनी घटना स्थळी भेट देऊन गाडी सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आली.या घटनेत सुदैवाने चालकाच्या प्रसंगसावधानतेमुळे कोणत्याही प्रकारची जीवित हानी झाली नाही.खलील इमानदार यांनी औरंगाबादवरून गाडी बोलवून औरंगाबादला रवाना झाले.

Show More

mh20live

आपल्या हक्काचे लोकप्रिय रोखठोक डिजिटल व्यासपीठ MH20LIve 🎥🖋️ mh20live चॅनल आपल्या हक्काचे चॅनल आपल्या भागातील ताज्या घडामोडी,संस्कृती, मनोरंजन व क्राइम बातम्या बघण्यासाठी www.mh20live.com आमच्या चॅनललाsubscribe करून घंटी समोरील बटन दाबा. mh20live Network अल्पावधीतच प्रसिद्धी मिळत असून महाराष्ट्रभर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे.संर्पक [email protected] MH20Live हे न्यूज पोर्टल mh20live Network Group यांनी प्रसारित केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे. औरंगाबाद न्याय कक्ष)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
Close
Close