Subscribe to our Newsletter
Loading
उद्योगधंदे आणि बिजिनेस

नवीन टर्म इन्शुरन्स कॅम्पेन डिसिजन २ प्रोटेक्ट साठी एचडीएफसी लाईफकडून ग्राहक अनुभव जाणून घेण्याचा प्रयत्न

नवीन टर्म इन्शुरन्स कॅम्पेन #डिसिजन २ प्रोटेक्ट  साठी एचडीएफसी लाईफकडून ग्राहक अनुभव जाणून घेण्याचा प्रयत्न

मुंबई,: एचडीएफसी लाईफ हा भारताचा अग्रगण्य जीवन विमा पुरवठादार असून त्यांच्याद्वारे डिसिजन २ प्रोटेक्ट कॅम्पेनचे लॉन्च करण्यात आले. त्यांचे सुरू असलेले प्रोटेक्शन कॅम्पेन डिसिजन २ प्रोटेक्टt हे ग्राहकांकडून मिळालेल्या प्रतिक्रियांच्या आधारावर तयार करण्यात आले आहे. पॉलिसीधारकांच्या कथा आणि त्यांच्या अनुभवांतून टर्म प्लान्सच्या आवश्यकतेवर हे आधारलेले आहे. यामध्ये स्वत:चा अनुभव पॉलिसीधारक कथन करतात.

संशोधन कामकाजाचा भाग म्हणून कंपनीने एचडीएफसी लाईफ टर्म प्लान निवडीमागची कारणे सध्याच्या पॉलिसीधारकांकडून जाणून घेण्यासाठी त्यांच्याशी संपर्क साधला. अशा पद्धतीने ग्राहकांशी संपर्क साधल्याने त्यांना उत्पादनाविषयी भविष्यातील अंदाज बांधता आला, तसेच त्यांच्या मोठ्या प्रमाणावर असलेल्या ग्राहकांकडून ठोस कथा ऐकता आल्या. या कथांचा फायदा ग्राहकांकडून मिळालेल्या पोचपावतीवर आधारीत कॅम्पेनसाठी झाला.

लॉन्चप्रसंगी बोलताना एचडीएफसी लाईफचे सिनिअर ईव्हीपी (सेल्स) आणि सीएमओ पंकज गुप्ता म्हणाले की“ज्यांना आमची जीवनविमा उत्पादने फायदेशीर वाटतात, जे आमचे ग्राहक आहेत आम्ही अशा पॉलिसीधारकांसाठी कॅम्पेन तयार केले आहे. आमची उत्पादने इतकी अनिश्चितता असूनही नेमकी कशा पद्धतीने काम करतात आणि ग्राहकांना आयुष्य जगण्यासाठी साह्य करतात याविषयीचे त्यांचे विचार इथे स्पष्ट केले आहेत. (टर्म इन्शुरन्ससारख्या) शक्तिशाली थीम वैश्विक आहेत आणि मोठ्या प्रमाणावर त्यांचा अंगीकार रुजेल याविषयी आम्हाला आत्मविश्वास वाटतो.

टर्म लाईफ इन्शुरन्ससारख्या ही संकल्पना चांगल्या पद्धतीने रुजलेली आहे, प्रत्येक व्यक्ती काळानुसार वागत नाही किंवा उत्पादनाचा लाभ घेत नाही. चांगल्याप्रकारे जनजागृती निर्माण करण्याची आपली जबाबदारी असते. प्रत्येक व्यक्तीने योग्यवेळी स्वत:च्या संरक्षणाचा निर्णय घ्यायचा असतो.

कोविड-19 महामारीने लक्षावधी लोकांच्या आयुष्यावर विपरीत परिणाम केला. तसेच अनिश्चितता आणली. स्वत: आणि कुटुंबासाठी संरक्षक कवच असावे ही वित्तीय जबाबदारी प्रत्येकाने जाणली. टर्म इन्शुरन्स नेमके हेच उपलब्ध करून देतो. हे उत्पादन कुटुंबाकरिता संरक्षक कवच आहे, जे आयुष्यातील अनिश्चिततेच्या काळात मदतीचे ठरते.”

वर्षाच्या पूर्वार्धात एचडीएफसी लाईफद्वारे एचडीएफसी लाईफ’ज क्लिक 2 प्रोटेक्ट टर्मच्या जनजागृतीसाठी प्रोटेक्शन कॅम्पेन लॉन्च करण्यात आले होते. सध्याच्या कॅम्पेनने एक पाऊल पुढे घेत त्यामध्ये केवळ टर्म प्लानची गरज अधोरेखित केली नाही तर त्यामुळे लोकांच्या वास्तविक आयुष्यात कसा बदल घडला हे देखील मांडले आहे. टेलिव्हिजन, डीटीएच आणि डिजीटलसह हे कॅम्पेन अनेक मल्टी-मीडिया प्लॅटफॉर्मवर प्रमोट करण्यात येणार आहे.

आपले सर्वांचे आयुष्य हे अनिश्चिततेने भरलेले आहे हेच सरत असलेल्या वर्षाने शिकवले. मात्र थोडेफार द्रष्टेपण ठेवल्यास आपण आपतकालीन प्रसंगांवर मात करू शकतो. एचडीएफसी लाईफ’चे नवीन #Decision2Protect कॅम्पेन लोकांच्या खऱ्या आयुष्यातील उदाहरणांचा वेध घेते आहे, आपल्या जीवलगांच्या आयुष्यात येणाऱ्या कठीण प्रसंगांचा मुकाबला करणारे हे उत्पादन आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, तुमच्या कुटुंबाचे कायम रक्षण करण्यासाठी एक छोटा निर्णय मोठी भूमिका बजावतो हा अतिशय महत्त्वाचा संदेश या निमित्ताने मिळतो,” असे मॅनेजिंग डायरेक्टर –भारत राजदीपक दास आणि चीफ क्रिएटीव्ह ऑफिसर – दक्षिण आशियालिओ बर्नेट यांनी सांगितले.

भारतात जीवन विमा प्रवेशाचा दर आजही 2.74% असून तो जगाच्या तुलनेत कमी आहे. विमा वापर कमी असल्याने मृत्यू कवच उपलब्ध होण्यातही देशात मोठी तूट आढळते. कोविड-19 आता सर्वांच्या आयुष्याचा भाग झाला असून ग्राहकांनी अनिश्चिततेच्या काळात भवितव्य सुरक्षित करण्याचे महत्त्व जाणले आहे.

Show More

mh20live

आपल्या हक्काचे लोकप्रिय रोखठोक डिजिटल व्यासपीठ MH20LIve 🎥🖋️ mh20live चॅनल आपल्या हक्काचे चॅनल आपल्या भागातील ताज्या घडामोडी,संस्कृती, मनोरंजन व क्राइम बातम्या बघण्यासाठी www.mh20live.com आमच्या चॅनललाsubscribe करून घंटी समोरील बटन दाबा. mh20live Network अल्पावधीतच प्रसिद्धी मिळत असून महाराष्ट्रभर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे.संर्पक [email protected] MH20Live हे न्यूज पोर्टल mh20live Network Group यांनी प्रसारित केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे. औरंगाबाद न्याय कक्ष)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
Close
Close