Subscribe to our Newsletter
Loading
औरंगाबाद

ह.भ.प.ज्ञानेश्वर माउली शेलुदकर महाराज यांना सेवा गौरव पुरस्काराने सन्मानित

MH20live Network


औरंगाबाद -सु-लक्ष्मी बहुद्देशिय सेवाभावी संस्था औरंगाबाद व माणुसकि रुग्णसेवा समुह शासकीय रुग्णालय घाटी यांच्या माणुसकीच्या तिसऱ्या वर्धापन दिनानिमित्त सेवा गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते पन काही कारनास्तव मावली उपस्थित नाही राहु शकले नव्हते म्हणुन आज माणुसकी समुहातर्फे माणुसकी सलुनच्या दुसऱ्या वर्धापन दिनानिमित्त छोटेखानी कार्यक्रमात समाजसेवक सुमित पंडित यांच्या हस्ते पुरस्कार मावलींना प्रदान करन्यात आला.
ह.भ.प.ज्ञानेश्वर माउली शेलुदकर यांचा जन्म शेलुद या गावी झाला वडिलोपार्जित वारकरी संप्रदायामध्ये त्यांच्या घराण्याला आवड होती.ज्ञानेश्वर माऊली यांनी समाज प्रबोधन व कीर्तनाच्या माध्यमातून 1992 पासून त्यांना कीर्तन आवड निर्माण झाली. किर्तनाची ज्ञानगंगा समाजातील तळागाळातल्या लोकांपर्यंत पोहोचवण्याचे कार्य शेलुदकर माऊली करीत आहे.त्याचबरोबर समाजाचे काही देणे लागतो म्हणून त्यांनी व्यसनमुक्ती साठी मोठि चळवळ उभी केली.आज भरकटलेली तरुणाई व्यसनाधीन झालेले तरुण त्यांची समजूत घालून त्यांची मानसिकता बदलून माऊलींनी कितीतरी व्यसनाधीन झालेल्या लोकांची व्यसन सोडवली आहे एवढेच नव्हे तर त्यांनी आत्तापर्यंत आई-वडील नसलेल्या मुलींचे लग्न देखील स्वखर्चाने लावून दिली आहे. समाजामध्ये एक आदर्श निर्माण करणे हजारो लोकांना व्यसनमुक्त करणे २७ वर्षापासून हे कार्य आजपर्यंत माऊलीच्या हातून घडत आहे त्यांचे वैशिष्ट्य म्हणजे त्यांच्या चेहऱ्यावरील हास्य इतरांना प्रेरणा देणे सामाजिक कार्यात कुठेही अग्रेसर राहणे कोणत्याही पैशाची हाव न ठेवता माऊली परमेश्वराचं का म्हणून सेवा देत आहे त्यांचे वैशिष्ट्य म्हणजे माउलीच्या शेलुद याठिकाणी कितीतरी वृद्ध दररोज जेवण्यासाठी असतात ही अन्नदानाची सेवा कायमस्वरूपी माउलीच्या हातून घडत आहे. ज्ञानेश्वर मावली शेलुदकर कीर्तनकार यांना माणुसकी ग्रुप चा सलाम.
ह्या पुरस्काराने ज्ञानेश्वर मावली यांचे समाजामध्ये सर्वेत्र कौतुक केले जात आहे.या कार्यक्रमासाठी दिलीप सोनवणे,ज्ञानेश्वर पंडित,डिंगांबर सोनवणे,सचीन राजपुत,सुमित पंडित,अजय वाघमारे, विष्णु बोर्डे,आदि उपस्थित होते.

माणसाने कसं जगावं हे सुमित पंडित कडून शिकाव:- किर्तनकार ज्ञानेश्वर मावली शेलुदकर

प्रत्येकाला इतक झालंय मी आणि माझं असं याचं वाईट वाटतं आपल्या सभोवताली सर्व लोक आहेत त्यामुळे आपण आहोत ही भावना आपण कदाचित विसरलो आहोत हे कदापि विसरुन चालणार नाही हे आपण सर्वांनी करून घ्यावं ज्याप्रमाणे बॅग गुजरे लोक जगतात आपण सुसंस्कृत असताना फरक काय असं म्हटल तर वावगे ठरणार नाही माणसाने माणसाची माणसा सारखे वागणे माणसाने कसे जगावे ही सुमित पंडित कडून शिकाव सुमित पंडित वृक्ष लावतात माणसांची माणसांसाठी धावून जातात मदत करतात त्या रीतीने मोठा माणूस म्हणून एक ते बनवून त्यांनी वेगळी पर्सनॅलिटी बनवली आहे मला वाटलं म्हणून मागील वर्षी मी त्यांच्या बाबतीत संत तुकारामांच्या जे का रंजले गांजले!त्यासी म्हणे जो आपुले देव तेथेची जाणावा या ओळी त्यांच्यासाठी सार्थ ठरतात ज्या वेळेस जो मदत करतो त्याची आठवण होते.
———-(ह.भ.प.ज्ञानेश्वर मावली शेलुदकर)

Show More

mh20live

आपल्या हक्काचे लोकप्रिय रोखठोक डिजिटल व्यासपीठ MH20LIve 🎥🖋️ mh20live चॅनल आपल्या हक्काचे चॅनल आपल्या भागातील ताज्या घडामोडी,संस्कृती, मनोरंजन व क्राइम बातम्या बघण्यासाठी www.mh20live.com आमच्या चॅनललाsubscribe करून घंटी समोरील बटन दाबा. mh20live Network अल्पावधीतच प्रसिद्धी मिळत असून महाराष्ट्रभर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे.संर्पक [email protected] MH20Live हे न्यूज पोर्टल mh20live Network Group यांनी प्रसारित केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे. औरंगाबाद न्याय कक्ष)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
Close
Close