Subscribe to our Newsletter
Loading
क्राईममहाराष्ट्र

हर्षवर्धन जाधवांना 2 दिवसांची पोलीस कोठडी, वकिलांचा दानवेंवर आरोप!

पुणे: कन्नडचे माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांना 2 दिवसांची म्हणजे 18 डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. पुणे जिल्हा सत्र न्यायालयाने हा आदेश दिलाय. 18 डिसेंबरला पुन्हा या प्रकरणाची सुनावणी होणार आहे. अजय अमन चड्डा यांनी हर्षवर्धन जाधव यांच्याविरुद्ध हत्येचा प्रयत्न केल्याचा गुन्हा चतु:श्रृंगी पोलिस ठाण्यात दाखल केला होता. त्यानंतर मंगळवारी रात्री जाधव यांना अटक करण्यात आली होती
हर्षवर्धन जाधव यांना आज पोलिसांनी पुणे सत्र न्यायालयात हजर केलं. त्यावेळी जिल्हा सत्र न्यायालयाने जाधव यांना 2 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. सुनावणीदरम्यान जाधव यांनी आपल्याला राजकीय हेतूने अटक करण्यात आल्याचा आरोप केला. कॅन्टॉन्मेंट बोर्डातील नगरसेवक अमन चड्डा आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी आपल्याला मारहाण केल्याचा आरोप जाधव यांनी केलाय.

जाधवांच्या वकिलांचा दानवेंवर आरोप
हर्षवर्धन जाधव यांच्या वकिलांनी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांच्यावर गंभीर आरोप केलाय. जाधव यांच्या अटकेमागे दानवेंचा हात आहे. हर्षवर्धन जाधव हे दानवेंचे जावई आहेत. जाधव आणि दानवे यांच्यातील वाद सर्वश्रृत आहे. त्यामुळे राजकीय हेतूने ही कारवाई झाल्याचा आरोप जाधव यांच्या वकिलांनी केला आहे.

हर्षवर्धन जाधव यांच्याविरोधात खूनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल आहे. हर्षवर्धन जाधव यांच्यासह इषा झा यांच्याविरोधातही खूनाचा गुन्हा दाखल आहे. अमन अजय चड्डा यांच्या तक्रारीवरुन या दोघांविरोधात तक्रार दाखल केली आहे. पुण्यातील चतुश्नृंगी पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. अमन चड्डा यांनी आपल्या तक्रारीत त्यांचे आई वडील जखमी झाल्याचं म्हटलं आहे.
दरम्यान हर्षवर्धन जाधव यांच्यासोबत असणाऱ्या इशा झा या महिला सहकाऱ्यांचा विनयभंग करण्यात आल्याचे  त्यांचे वकील झहीर खान पठाण यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हटले आहे. औंधला जात असताना कारसमोर दुचाकी लावून अडवण्यात आले. यानंतर हर्षवर्धन आणि त्यांच्या महिला सहकाऱ्या कारमध्ये बसवण्यात आले. फिर्यादी अमन चड्डा, त्याचा भाऊ तुषार चढ्ढा आणि नगरसेवक मनिष आनंद यांनी हर्षवर्धन जाधव आणि इशा झा या दोघांना बेदम मारहाण केली. या वेळी हल्लेखोरांनी इशा झा यांचा विनयभंगही केला. हा प्रकार निर्भया प्रकरणापेक्षा कमी नाही असे हर्षवर्धन जाधव यांचे वकील झहीर खान पठाण यांनी म्हटले आहे.औरंगाबादमधील कौटुंबिक न्यायालयात हर्षवर्धन जाधव आणि त्यांच्या पत्नीतील वाद सुरु आहे.त्यावरून माझ्या जीवाला काही झाल्यास आपले सासरे रावसाहेब दानवे हे जबाबदार असतील असे हर्षवर्धन जाधव यांनी न्यायालयात स्पष्ट सांगितले होते.या खटल्यातील दोन प्रकरणात आमच्या बाजूने निकाल लागला. त्यामुळे असे  काही तरी होईल याची आम्हाला कल्पना होती,असेही यावेळी हर्षवर्धन जाधव यांचे वकील झहीर खान पठाण म्हणाले आहेत.

काय आह प्रकरण?

पुण्यात औंध भागात हर्षवर्धन जाधव यांनी त्यांच्या गाडीचा दरवाजा उघडताच रस्त्यावरून जाणाऱ्या महिलेला धक्का लागून इजा झाली होती. याचा जाब विचारताच हर्षवर्धन जाधव यांनी दाम्पत्याला मारहाण केली होती. त्यानंतर ते पसार झाले. मात्र पुढं जाऊन त्यांच्या वेगवान गाडीने एका दुचाकीस्वाराला उडवले. त्या ठिकाणी मात्र नागरिकांनी हर्षवर्धन यांना चोपले होते. त्यानंतर अमन अजय चड्डा यांनी दिलेल्या फिर्यादीवरून हर्षवर्धन जाधव आणि इषा झा या दोघांविरोधात पुण्यात खूनाचा गुन्हा दाखल दाखल करण्यात आला.

हर्षवर्धन जाधवांची वादग्रस्त कारकीर्द

हर्षवर्धन जाधव यांची राजकीय कारकीर्द नेहमीच वादग्रस्त राहिली आहे. मनसेकडून आमदार झालेल्या जाधव यांनी नंतर शिवसेनेत प्रवेश केला होता. मात्र तिथंही मतभेद झाल्यानंतर त्यांनी 2019 ची लोकसभा निवडणूक अपक्ष म्हणून लढवली. हर्षवर्धन जाधव हे त्यांच्या कौटुंबिक कलहामुळेही कायम चर्चेत असतात. सासरे रावसाहेब दानवे यांच्यावर आगपाखड करण्याची एकही संधी ते सोडत नाहीत.

Show More

mh20live

आपल्या हक्काचे लोकप्रिय रोखठोक डिजिटल व्यासपीठ MH20LIve 🎥🖋️ mh20live चॅनल आपल्या हक्काचे चॅनल आपल्या भागातील ताज्या घडामोडी,संस्कृती, मनोरंजन व क्राइम बातम्या बघण्यासाठी www.mh20live.com आमच्या चॅनललाsubscribe करून घंटी समोरील बटन दाबा. mh20live Network अल्पावधीतच प्रसिद्धी मिळत असून महाराष्ट्रभर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे.संर्पक [email protected] MH20Live हे न्यूज पोर्टल mh20live Network Group यांनी प्रसारित केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे. औरंगाबाद न्याय कक्ष)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
Close
Close