Subscribe to our Newsletter
Loading
राजकीय

हर्षवर्धन जाधव अन् पत्नी संजना यांचे पॅनल आमनेसामने अकरावीतील आदित्य जाधवांनी केली वडिलांच्या पॅनलची घाेषणा

हर्षवर्धन जाधव राजकारणात सक्रिय – मुलगा आदित्य हर्षवर्धन जाधवची घोषणा
आदित्य जाधवांच्या रुपाणे रायभान जाधवांची तिसरी पिढी सक्रिय

कन्नड : कन्नडच्या राजकारणात मंगळवारी नवीन टि्वस्ट पाहायला मिळाला. मारहाण प्रकरणात पुण्यात अटकेत असलेल्या माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांच्या पॅनलची घोषणा अकरावीत शिकत असलेले त्यांचे सुपुत्र आदित्य जाधव यांनी केली.

मारहाण प्रकरणात पुण्यात अटकेत असलेल्या माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांच्या पॅनलची घोषणा अकरावीत शिकत असलेले त्यांचे सुपुत्र आदित्य जाधव यांनी केली. विशेष म्हणजे हर्षवर्धन यांचे पॅनल हे त्यांच्याच पत्नी व केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांच्या कन्या संजना जाधव यांच्या समोर उभे करण्यात आले. आदित्य यांनी वडिलांच्या अनुपस्थितीत मंगळवारी कन्नडमध्ये पत्रकार परिषद आयोजित करून पॅनलची अधिकृत घोषणा केली. तालुक्यातील त्रस्त शेतकऱ्यांच्या समस्या सोडवण्यासाठी हर्षवर्धन राजकारणात सक्रिय होत असल्याचे यावेळी त्यांनी सर्व पत्रकारांना सांगितले.

ग्रामपंचायत निवडणुकीच्या रणधुमाळीत रायभान जाधव यांची तिसरी पिढी राजकारणात सक्रिय झाली आहे. नवख्या आदित्य यांनी पत्रकारांच्या खोचक प्रश्नांनाही अतिशय समर्पक उत्तरे दिली. हर्षवर्धन अटकेत असताना आदित्य यांनी स्वतः सर्व सूत्रे हातात घेतली. यानिमित्ताने स्वतःचीही राजकीय वाटचाल सुरू केल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या. तालुक्यातील सर्व कार्यकर्ते सोबत असल्याचे सांगत तालुक्यातील जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याचेही यावेळी त्यांनी स्पष्ट केले.

आदित्य जाधवांनी पत्रकारांच्या खोचक प्रश्नांची कसलेल्या नेत्याप्रमाणे दिली उत्तरे

– उत्तर . घटनेने सर्वांना निवडणुकीत उभे राहण्याचा हक्क दिलेला आहे. त्यामुळे कुणी निवडणुकीला सामोरे जावे अथवा नाही, हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे. घटनेने दिलेले हक्क कोणी बजावत असेल तर त्यात वावगे वाटण्यासारखे काही नाही.

प्रश्न. वडील राजकारणात असताना अनेक मोठ्या नेत्यांसोबत त्यांचे वाद झाले?– उत्तर. राजकारणात शेतकऱ्यांसाठी लढताना व त्यांना न्याय मिळवून देताना या गोष्टी होतच असतात. समाजातील याच घटकांसाठी ते पुन्हा एकदा राजकारणात सक्रिय होत आहेत.> प्रश्न. वाद झालेले ते मोठे नेते म्हणजे नेमके कोण आहेत?- उ. ज्या मोठ्या नेत्यांसोबत वाद झाले ते वैयक्तिक प्रश्नांवर झाले नसून शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर झाले. त्यामुळे कोणाचेही नाव घेणे संयुक्तिक होणार नाही. > प्रश्न. पॅनलबाबत वडिलांशी चर्चा झाली का? – उत्तर. नाही. अद्याप त्यांच्याशी काही बोलणे झाले नाही. पण, माझे आजोबा रायभान यांच्यानंतर वडिलांनी शेतकऱ्यांचे प्रश्न मांडले. आता ते येथे उपलब्ध नसल्याने शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी मी स्वत: हा निर्णय घेतला आहे.

Show More

mh20live

आपल्या हक्काचे लोकप्रिय रोखठोक डिजिटल व्यासपीठ MH20LIve 🎥🖋️ mh20live चॅनल आपल्या हक्काचे चॅनल आपल्या भागातील ताज्या घडामोडी,संस्कृती, मनोरंजन व क्राइम बातम्या बघण्यासाठी www.mh20live.com आमच्या चॅनललाsubscribe करून घंटी समोरील बटन दाबा. mh20live Network अल्पावधीतच प्रसिद्धी मिळत असून महाराष्ट्रभर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे.संर्पक [email protected] MH20Live हे न्यूज पोर्टल mh20live Network Group यांनी प्रसारित केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे. औरंगाबाद न्याय कक्ष)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
Close
Close