Subscribe to our Newsletter
Loading
शेतीविषयक

पालकमंत्री शंकराव गडाख यांच्या हस्ते ढोकी येथून शेतकऱ्यांच्या बांधावर बी-बियाणे व खत वाटपाचा शुभारंभ

mh20live.com

उस्मानाबाद : तालुका कृषी विभागाद्वारे कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) अंतर्गत कोरोना आजाराच्या पार्श्वभूमीमूळे खते, बियाणे थेट शेतकऱ्यांच्या बांधावर पुरवठा करण्याच्या योजनेचा शुभारंभ आज ढोकी सर्कल येथून मृद व जलसंधारण मंत्री तथा पालकमंत्री ना. शंकरराव गडाख-पाटील यांच्या हस्ते झाला.

      यावेळी उस्मानाबाद जिल्ह्याचे खासदार ओमप्रकाश राजेनिंबळकर, आ. कैलास घाडगे-पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.

 तालुक्यातील शेतकरी व महिला बचत गटाच्या माध्यमातून कृषी निविष्ठांचा शेतकऱ्यांच्या बांधावर थेट पुरवठा करण्याचे उस्मानाबाद कृषी विभागाद्वारे उद्धिष्ट ठेवण्यात आले आहे. यानुसार आज ढोकी, वाखरवाडी, कोल्हेगाव, गोरेवाडी, कावळेवाडी, तुगाव, कसबे तडवळे, गोपाळवाडी येथील कृषी विभागाद्वारे कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) बचतगटाच्या माध्यमातून खते वाटप करण्यात आली.

यावेळी आ.कैलास घाडगे-पाटील, जिल्हा कृषी अधीक्षक बजरंग मंगरुळकर, उपविभागीय कृषी अधिकारी श्री. कोळेकर, उपविभागीय अधिकारी रामेश्वर रोडगे, तहसीलदार गणेश माळी, उपविभागीय पोलिस अधिकारी सुरेश पाटील, कृषी विकास अधिकारी श्री.चिमनशेट्टी साहेब, तालुका कृषी अधिकारी डी आर जाधव, पं.स.सदस्य संग्राम देशमुख, सरपंच नाना काळे, उपसरपंच अमोल समुद्रे, सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरेश बनसोडे, माजी सभापती दगडू धावारे, तानाजी माळी, पोलिस पाटील राहुल वाकुरे, भारत काका देशमुख, उद्धव समुद्रे, मोहन शिंदे, उमेश शिंदे, मंडळ अधिकारी श्री.मगर साहेब, कृषी परवेक्षक श्री. सुरवसे साहेब, कृषी सहाय्यक श्री माकोडे, श्री. आडसूळ, श्री. शिंदे, श्री. भडंगे, शेतकरी वर्ग तसेच ढोकी येथिल रासायनिक खत विक्रेते उपस्थित होते.

Show More

mh20live

आपल्या हक्काचे लोकप्रिय रोखठोक डिजिटल व्यासपीठ MH20LIve 🎥🖋️ mh20live चॅनल आपल्या हक्काचे चॅनल आपल्या भागातील ताज्या घडामोडी,संस्कृती, मनोरंजन व क्राइम बातम्या बघण्यासाठी www.mh20live.com आमच्या चॅनललाsubscribe करून घंटी समोरील बटन दाबा. mh20live Network अल्पावधीतच प्रसिद्धी मिळत असून महाराष्ट्रभर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे.संर्पक [email protected] MH20Live हे न्यूज पोर्टल mh20live Network Group यांनी प्रसारित केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे. औरंगाबाद न्याय कक्ष)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
Close
Close