Subscribe to our Newsletter
Loading
महाराष्ट्र

पालकमंत्र्यांनी हात आखडता न घेता कोविडसाठी निधी दिला! आ. बाळाराम पाटील यांची स्पष्टोक्ती



कामोठे/प्रतिनिधी
कोविड काळात अतिशय भयावह परिस्थिती निर्माण झाली होती. पनवेल महापालिका क्षेत्र आणि संपूर्ण तालुक्याचा विचार करता राज्य शासन ठामपणे आपल्या मागे उभे राहिले. पालकमंत्री आदितीताई तटकरे यांनी हात आखडता न घेता आर्थिक निधी पुरविला, अशी स्पष्टोक्ती कोकण शिक्षण मतदार संघाचे आ. बाळाराम पाटील यांनी दिली.
कोकण शिक्षक मतदार संघाचे आ. बाळाराम पाटील यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून ३५ कोविड योद्ध्यांना कोविड देवदूत पुरस्कार देवून गौरविण्यात आले. यावेळी ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते.
ते पुढे म्हणाले की, वाढदिवस हे निमित्त आहे. सर्व कार्यक्रम रद्द करून केवळ कोविड देवदूतांचा सत्कार करण्यासाठी, त्यांच्या कामाची कदर करून शाबासकीची थाप देण्यासाठी कार्यक्रमाचे आयोजन केले आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.
कोविड काळात सरकारी आणि काही सेवाभावी खासगी डॉक्टर, समाजसेवक दिवस-रात्र राबले, परंतु कुणाचाही मोबाईल बंद नव्हता ही वाखाणण्याजोगी बाब नोंद करावीच लागेल. सर्वांचीच फार ओढाताण होत असताना, रुग्णांना दिलासा देणे, त्यांची व्यवस्था करणे अवघड असतानाही त्यात आपण सारे यशस्वी झालो, याचा अभिमान वाटत असल्याचे आ. पाटील यांनी सांगितले.
यावेळी ज्येष्ठ पत्रकार कांतीलाल कडू, सुदाम पाटील, शिवसेनेच्या कामोठे आघाडी प्रमुख सुवर्णा वाळूंज आदींची भाषणे झाली.
व्यासपीठावर आ. बाळाराम पाटील, जिल्हा परिषद अध्यक्षा योगिता पारधी, माजी नगराध्यक्ष जे. एम. म्हात्रे,शेकाप नेते काशिनाथ पाटील, ज्येष्ठ पत्रकार कांतीलाल कडू, पनवेल जिल्हा कॉंग्रेसचे कार्याध्यक्ष सुदाम पाटील, समाजवादीचे जिल्हाध्यक्ष अनिल नाईक, नगरसेविका प्रज्योती म्हात्रे, गणेश कडू, डॉ. नागनाथ येमपल्ले, राष्ट्रवादीचे प्रदेश सचिव सुरदास गोवारी, नारायणशेठ घरत, शंकरशेठ म्हात्रे, माया अहिरे, समाजसेवक बागूल यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रकाश म्हात्रे यांनी केले.
पनवेल महाविकास आघाडीची धुरा कांतीलाल कडू यांनी खांद्यावर घ्यावी!
अष्टपैलू व्यक्तीमत्व असलेले ज्येष्ठ पत्रकार कांतीलाल कडू यांना व्यासपीठावर पाहून आनंद होत असून त्यांनी आता पनवेलच्या महाविकास आघाडीची धुरा खांद्यावर घ्यावी, असे जाहीर आवाहन करून राजकीय खळबळ उडवून दिली.

Show More

mh20live

आपल्या हक्काचे लोकप्रिय रोखठोक डिजिटल व्यासपीठ MH20LIve 🎥🖋️ mh20live चॅनल आपल्या हक्काचे चॅनल आपल्या भागातील ताज्या घडामोडी,संस्कृती, मनोरंजन व क्राइम बातम्या बघण्यासाठी www.mh20live.com आमच्या चॅनललाsubscribe करून घंटी समोरील बटन दाबा. mh20live Network अल्पावधीतच प्रसिद्धी मिळत असून महाराष्ट्रभर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे.संर्पक [email protected] MH20Live हे न्यूज पोर्टल mh20live Network Group यांनी प्रसारित केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे. औरंगाबाद न्याय कक्ष)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
Close
Close