Subscribe to our Newsletter
Loading
महाराष्ट्र

पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांनी दिली मुरुड ग्रामीण रुग्णालयास भेट

अलिबाग,जि.रायगड, दि.12 mh20live Network :– पालकमंत्री कु. आदिती तटकरे यांनी आज मुरूड येथील ग्रामीण रूग्णालयास भेट देवून करोनाबाधित रूग्णांना मिळणारे उपचार तसेच तेथील सोयीसुविधा आणि समस्यांबाबत सविस्तर माहिती जाणून घेतली.
कु.तटकरे यांनी येथील करोनाबाधित रूग्णांवर वेळेवर आवश्यक ते उपचार मिळावेत, याकरिता संबंधितांना सूचना केल्या. मुरुड ग्रामीण रूग्णालयास रूग्णवाहिका व जनरेटर उपलब्ध करून देण्याचे निर्देशही त्यांनी प्रशासनास दिले. प्रसंगी मुरूड येथील खाजगी रूग्णालयातील डाॅक्टर्सनी उद्यापासूनच संपूर्ण काळजी घेऊन ग्रामीण रूग्णालयात ओपीडी सुरू करून सेवा देण्याचा निर्णयही यावेळी घेण्यात आला. यावेळी पालकमंत्री कु. आदिती तटकरे यांच्यासमवेत मुरूडच्या नगराध्यक्षा सौ. स्नेहा पाटील, पं.स.सभापती सौ. अंशिका ठाकूर, श्री.मंगेश दांडेकर, श्री.आतिक खतीब, प्रांताधिकारी सौ.शारदा पोवार, तहसिलदार श्री.गमन गावित, तालुका आरोग्य अधिकारी डॉ.जगताप, ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ.इंगळे यांच्यासह इतर अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

Show More

mh20live

आपल्या हक्काचे लोकप्रिय रोखठोक डिजिटल व्यासपीठ MH20LIve 🎥🖋️ mh20live चॅनल आपल्या हक्काचे चॅनल आपल्या भागातील ताज्या घडामोडी,संस्कृती, मनोरंजन व क्राइम बातम्या बघण्यासाठी www.mh20live.com आमच्या चॅनललाsubscribe करून घंटी समोरील बटन दाबा. mh20live Network अल्पावधीतच प्रसिद्धी मिळत असून महाराष्ट्रभर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे.संर्पक [email protected] MH20Live हे न्यूज पोर्टल mh20live Network Group यांनी प्रसारित केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे. औरंगाबाद न्याय कक्ष)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
Close
Close