Subscribe to our Newsletter
Loading
औरंगाबाद

शासनाच्या लोककल्याणकारी योजना व कोविड-19 जनजागृती कार्यक्रमाचा पालकमंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ

माहिती व जनसंपर्क महासंचालनालय व जिल्हा माहिती कार्यालय आयोजित

औरंगाबाद :दि. 25- माहिती व जनसंपर्क महासंचालनालय व जिल्हा माहिती कार्यालय, औरंगाबादतर्फे शासनाच्या लोककल्याणकारी योजना व कोविड-19 या आजाराबाबत लोककलांच्या माध्यमातून जनजागृती करण्यात येत आहे. या उपक्रमाचा शुभारंभ राज्याचे उद्योगमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुभाष देसाई यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून आज करण्यात आला.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात झालेल्या या कार्यक्रमास आमदार अंबादास दानवे, जिल्हाधिकारी सुनील चव्हाण, पोलीस आयुक्त निखिल गुप्ता, मनपा प्रशासक अस्तिककुमार पांडेय, जिल्हा माहिती अधिकारी मुकुंद चिलवंत यांच्यासह विविध विभागांचे व माध्यमांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
विद्यमान सरकारला एक वर्ष पूर्ण झाल्याच्यानिमित्ताने गेल्या वर्षभरात या सरकारने घेतलेले लोककल्याणकारी निर्णय त्याचबरोबर ‘कसम आणि कोविड-19 आजाराबाबत’ कोरोना काळात शासनाने केलेल्या कामांबाबत माहिती व जनसंपर्क महासंचालनालय अतंर्गत जिल्हा माहिती कार्यालय, औरंगाबाद यांच्यावतीने लोककला व पथनाट्याच्या माध्यमातून जिल्ह्यातील प्रमुख गावांमध्ये जनजागृती अभियान राबविण्यात येत आहे.
लोककला आणि पथनाट्य शासनाच्या लोककल्याणकारी योजना जनेतेपर्यंत पोहचवण्याचे प्रभावी माध्यम असून याचा नागरीकांना लाभ घ्यावा असे आवाहन पालकमंत्री सुभाष देसाई यांनी यावेळी केले.
लोककला आणि पथनाट्याच्या माध्यमातून जनजागृती करण्या-या औरंगाबाद जिल्ह्यातील 15 संस्थांचा शासनाच्या यादीत समावेश आहे. या संस्थांमार्फत जिल्ह्यातील 9 तालुक्यातील बाजारपेठेच्या व मोठ्या 180 गावांमध्ये शासनाच्या लोककल्याणकारी योजनांची प्रचार व प्रसिध्दी करण्यात येणार आहे.

Show More

mh20live

आपल्या हक्काचे लोकप्रिय रोखठोक डिजिटल व्यासपीठ MH20LIve 🎥🖋️ mh20live चॅनल आपल्या हक्काचे चॅनल आपल्या भागातील ताज्या घडामोडी,संस्कृती, मनोरंजन व क्राइम बातम्या बघण्यासाठी www.mh20live.com आमच्या चॅनललाsubscribe करून घंटी समोरील बटन दाबा. mh20live Network अल्पावधीतच प्रसिद्धी मिळत असून महाराष्ट्रभर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे.संर्पक [email protected] MH20Live हे न्यूज पोर्टल mh20live Network Group यांनी प्रसारित केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे. औरंगाबाद न्याय कक्ष)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
Close
Close