Subscribe to our Newsletter
औरंगाबाद

शासन दुग्ध उत्पादकांच्या खंबीरपणे पाठिशी :दुग्ध विकास मंत्री सुनील केदार

 विविध शेळी पालकांशी साधला संवाद
 गोलवाडीतील सिडको क्रीडांगणास भेट
 जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या दुग्ध शाळेची पाहणी


औरंगाबाद : शेतकऱ्यांचा विकास हाच शासनाचा केंद्रबिंदू आहे. त्याचबरोबर राज्यातील कष्टकरी दुग्ध उत्पादकांच्या पाठिशी शासन खंबीरपणे आहे. मागील वर्षाच्या मार्च महिन्यात लॉकडाऊनमुळे अधिक दुधाचा प्रश्न भेडसावू नये, यासाठी शासनाने दुग्ध संकलन सहकार क्षेत्रातूनच केले. सहकार क्षेत्राला यातून मदतच झाली, असे प्रतिपादन दुग्ध विकास, पशुसंवर्धन, क्रीडा व युवक कल्याण मंत्री सुनील केदार यांनी केले.
गांधेली येथील जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या दुग्धशाळा पाहणी दरम्यान श्री.
केदार बोलत होते. यावेळी उत्पादक संघाचे अध्यक्ष तथा आमदार हरिभाऊ बागडे, आमदार संजय
शिरसाट, माजी आमदार कल्याण काळे आदींसह उत्पादक संघाचे उपाध्यक्ष नंदलाल काळे,
संचालक कचरू डिके, राजेंद्र जैस्वाल, गोकुळसिंग राजपूत, राजेंद्र पाथ्रीकर, पुंडलिकराव काजे,
दिलीप निरपळ, व्यवस्थापकीय संचालक डॉ.पी.बी.पाटील आदींची उपस्थिती होती.
मंत्री केदार म्हणाले, बाहेर राज्यातील काही दूध संस्थांनी राज्यातील दुधाची बाजारपेठ
काबीज केली आहे. यावर सर्व लोकप्रतिनिधींनी चिंतन करण्याची आवश्यकता आहे. सध्याचा काळ
कोरोना विषाणूच्या प्रसारामुळे संकटकाळ आहे. या काळात सर्वांनी शासनाच्या सर्व सूचनांचे
पालन करणे आवश्यक आहे, असे मतही श्री. केदार यांनी व्यक्त केले.
सुरूवातीला श्री. केदार यांनी उत्पादक संघाच्या दुग्ध शाळेतील दुधापासून निर्मित विविध
पदार्थांची पाहणी करून उत्पादन प्रक्रिया समजून घेतली. यामध्ये दुग्ध शाळेतील कंदी पेढा, लस्सी,
तूप, आइसक्रीम, प्रयोगशाळा, पॅकिंग आदी विभागांनाही भेटी दिल्या. भेटी दरम्यान दुग्धशाळेतील
स्वच्छता, नीटनेटकेपणा याबाबत समाधान व्यक्त करत अधिकारी, कर्मचाऱ्यांचे कौतूक श्री. केदार
यांनी केले. यावेळी श्री. बागडे यांनी संपूर्ण दुग्ध शाळेतील प्रकियेबाबत श्री.केदार यांना सविस्तर
माहिती दिली.

Show More

mh20live

आपल्या हक्काचे लोकप्रिय रोखठोक डिजिटल व्यासपीठ MH20LIve 🎥🖋️ mh20live चॅनल आपल्या हक्काचे चॅनल आपल्या भागातील ताज्या घडामोडी,संस्कृती, मनोरंजन व क्राइम बातम्या बघण्यासाठी www.mh20live.com आमच्या चॅनललाsubscribe करून घंटी समोरील बटन दाबा. mh20live Network अल्पावधीतच प्रसिद्धी मिळत असून महाराष्ट्रभर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे.संर्पक [email protected] MH20Live हे न्यूज पोर्टल mh20live Network Group यांनी प्रसारित केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे. औरंगाबाद न्याय कक्ष)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close