Subscribe to our Newsletter
Loading
औरंगाबादमहाराष्ट्र

सरकारने विद्यार्थ्यांना कोर्टात जाण्याचा सल्ला देऊ नये : मराठा आरक्षणाचे याचिकाकर्ते विनोद पाटील


संभाजीनगर /mh20live Network
मराठा आरक्षणाचे याचिकाकर्ते यांनी औरंगाबाद (संभाजीनगर) येथे आज पत्रकार परिषद घेऊन म्हटले आहे की, मराठा आरक्षणावर न्यायालयाने स्थगिती दिली पण न्यायालयाने स्पष्ट केले होते की आजपर्यंत झालेल्या भरती प्रक्रियेमध्ये व ऍडमिशन प्रोसेस मध्ये कुठल्याही प्रकारचा बदल करणार नाही. हा निर्णय लागून एक महिना झालेला आहे परंतु राज्य सरकारने अद्यापपर्यंत मराठा समाजातील विद्यार्थ्यांन्या नियुक्त्या दिलेल्या नाहीत. यासंदर्भात ज्या वेळेस विद्यार्थ्यांचे शिष्टमंडळ राज्य सरकारला भेटायला जातात तेव्हा राज्य सरकार स्पष्टपणे चुकीचा सल्ला देऊन विद्यार्थ्यांना सांगते आहे की या ऑर्डर चे स्पष्टीकरण माननीय सुप्रीम कोर्टामध्ये विद्यार्थ्यांनी जाणून घ्यावे.

यावर पुढे बोलतांना ते म्हणाले की, एकही विद्यार्थी सुप्रीम कोर्टामध्ये जाण्याचा संबंधच येत नाही, तेव्हा सरकारला वाटत असेल की नियुक्त्या दिल्या तर त्यात कॉर्तचा अवमान होईल, तर सरकारने स्वतः ‘क्लॅरिफिकेशन ऑफ ऑर्डर्स’ घ्यावेत, विद्यार्थ्यांना तेथे पाठवू नये अन्यथा हे प्रकरण तीन न्यायमूर्तींच्या खंडपीठाकडे जाऊन अजून विलंब लागेल. कारण विद्यार्थ्यांनी जर ‘क्लॅरिफिकेशन ऑफ ऑर्डर्स’ साठी सुप्रीम कोर्टात अर्ज केला तर प्रकरण पुन्हा त्या तीन न्यायूर्तींकडे जाईल आणि मूळ प्रकरण अगोदरच पाच न्यायमूर्तींच्या खंडपीठाकडे प्रलंबित आहे, म्हणून सगळी विस्कळीत परिस्थिती निर्माण होऊन मराठा समाजाचे अनेक वर्ष न्यायाच्या प्रतीक्षेत जातील. त्यामुळे राज्य सरकारने स्वतःवरील जबाबदारी झटकून विद्यार्थ्यांना कोर्टात जाण्याचा सल्ला न देता तात्काळ संबधीत सर्व विद्यार्थ्यांना नियुक्त्या द्याव्यात. 2014 ते 2020 दरम्यान झालेल्या सर्व भरती प्रक्रियेतील विद्यार्थ्यांना राज्य सरकार तात्काळ नियुक्तीपत्र द्यावेत, अशी मागणी त्यांनी यावेळी केली.

Show More

mh20live

आपल्या हक्काचे लोकप्रिय रोखठोक डिजिटल व्यासपीठ MH20LIve 🎥🖋️ mh20live चॅनल आपल्या हक्काचे चॅनल आपल्या भागातील ताज्या घडामोडी,संस्कृती, मनोरंजन व क्राइम बातम्या बघण्यासाठी www.mh20live.com आमच्या चॅनललाsubscribe करून घंटी समोरील बटन दाबा. mh20live Network अल्पावधीतच प्रसिद्धी मिळत असून महाराष्ट्रभर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे.संर्पक [email protected] MH20Live हे न्यूज पोर्टल mh20live Network Group यांनी प्रसारित केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे. औरंगाबाद न्याय कक्ष)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
Close
Close