Subscribe to our Newsletter
देशविदेश

घर घेणाऱ्यांना सुवर्णसंधी, स्टेट बॅंकेच्या होम लोन व्याज दरात मोठी कपात

मुंबई : SBI Home Loan : जर तुम्ही घर खरेदी घेण्याचा विचार करीत असाल तर तुम्हाला स्वस्तात घर घेण्याची उत्तम संधी आहे. देशातील सर्वात मोठी बँक असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडियाने (State Bank of India) गृहकर्ज स्वस्त केले आहेत. एसबीआयने (SBI) गृह कर्जावरील व्याजदर 6.70 टक्क्यांपर्यंत कमी केले आहेत. गृह कर्जाचे व्याज दर 75 लाख रुपयांपर्यंतच्या कर्जासाठी 6.70 टक्क्यांपासून आणि 75 लाख ते 5 कोटी रुपयांच्या कर्जासाठी 6.75 टक्के दराने सुरू होते.

गृह कर्जात सूट (Home loan discount)
भारतीय स्टेट बँक कर्जाची रक्कम आणि सीबिल स्कोअरवर अवलंबून 0.70 टक्के किंवा 70 बेस पॉईंटपर्यंत सवलत देत आहे. जर एखादी महिला कर्जदार ग्राहक असेल तर तिला 5 बेस पॉईंटची सूट मिळते. इतकेच नाही तर तुम्ही योनो एसबीआय अॅपद्वारे होम कर्जासाठी अर्ज केल्यास तसेच तुम्ही योनो एसबीआय अॅपच्या माध्यमातून गृह कर्जासाठी अर्ज केल्यास तुम्हाला 5 बेसिस पॉईंट्सची अतिरिक्त सूट मिळेल.

प्रोसेसिंग शुल्क नाही (Processing fees will not be paid)
भारतीय स्टेट बँकेकडून ऑफर करण्यात आली तर तुम्हाला गृह कर्जासाठी लागणारी प्रोसेसिंग फी भरण्याची गरज नाही. त्यावर बँक 100 टक्के सूट देत आहे. रिपोर्टनुसार ही सूट 31 मार्च 2021पर्यंत आहे.

बँक अनेक प्रकारचे होम लोन देते
एसबीआय सरकारी कर्मचार्‍यांना एसबीआय प्रिव्हिलेज होम (SBI Privilege Home Loan ) लोन देते. याशिवाय लष्करासाठी आणि संरक्षणासाठी एसबीआय शौर्य गृह कर्ज, (SBI Shaurya Home Loan) एसबीआय मॅक्सगेन होम लोन, एसबीआय स्मार्ट होम लोन, विद्यमान ग्राहकांसाठी टॉप अप लोन, एसबीआय एनआरआय होम लोन, महिलांसाठी SBI HerGhar Home Loan आणि अधिक रकमेसाठी SBI FlexiPay Home Loan उपलब्ध करुन देते.

Show More

mh20live

आपल्या हक्काचे लोकप्रिय रोखठोक डिजिटल व्यासपीठ MH20LIve 🎥🖋️ mh20live चॅनल आपल्या हक्काचे चॅनल आपल्या भागातील ताज्या घडामोडी,संस्कृती, मनोरंजन व क्राइम बातम्या बघण्यासाठी www.mh20live.com आमच्या चॅनललाsubscribe करून घंटी समोरील बटन दाबा. mh20live Network अल्पावधीतच प्रसिद्धी मिळत असून महाराष्ट्रभर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे.संर्पक [email protected] MH20Live हे न्यूज पोर्टल mh20live Network Group यांनी प्रसारित केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे. औरंगाबाद न्याय कक्ष)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close