Subscribe to our Newsletter
Loading
आरोग्य व शिक्षण

भारत व जगासाठी अखेरच्या टप्प्यापर्यंत लसींसाठीची शीतगृहांची साखळी बळकट करण्याचे ‘गोदरेज अँड बॉइस’चे लक्ष्य

भारत व जगासाठी अखेरच्या टप्प्यापर्यंत लसींसाठीची शीतगृहांची साखळी बळकट करण्याचे गोदरेज अँड बॉइसचे लक्ष्य

·         ‘जगासाठी, मेड इन इंडिया’ अल्ट्रा-लो टेम्परेचर फ्रीझरचे (उणे 80 अंश सेल्सियसच्या खाली) अनावरण; भारतातील सध्याच्या कोविड लसीकरण मोहिमेमध्ये तैनात असलेल्या विद्यमान पोर्टफोलिओचा विस्तार.

·         लसींसाठीच्या प्रगत शीतगृह तंत्रज्ञानातून ‘गोदरेज अँड बॉइस’ने भविष्यातील लसींसाठी भारताला केले सुसज्ज व आत्मनिर्भर.

·         भारतातील कोविड लसीकरण मोहिमेत सहभागी होत, अखेरच्या टप्प्यापर्यंत कोविड लस नेण्याकरीता ‘गोदरेज अँड बॉइस’ सज्ज.

भारत, 9 फेब्रुवारी 2021 : गोदरेज समुहाची प्रमुख कंपनी, ‘गोदरेज अँड बॉइस’ आपल्या स्थापनेपासूनच भारताला स्वावलंबी बनविण्यात हातभार लावत आहे. ‘गोदरेज अप्लायन्सेस’ या आपल्या बिझिनेस युनिटच्या माध्यमातून, देशातील आरोग्यसेवा क्षेत्रातील पायाभूत सुविधा निर्माण करण्याच्या दिशेने एक पाऊल पुढे टाकत, गोदरेज अँड बॉइस ही कंपनी सध्या देशात सुरू असलेल्या कोविड लसीकरण मोहिमेमध्ये सहभागी होत आहे. अतिशय संवेदनशील अशा लसी अगदी योग्य तपमानात सुरक्षितपणे साठविल्या जाव्यात, याकरीता प्रगत, देशातच बनविलेली ‘मेडिकल रेफ्रिजरेशन सोल्यूशन्स’ या कंपनीकडून पुरविली जात आहेत. आज या कंपनीने अत्याधुनिक, अल्ट्रा-लो (अतिशय कमी) तपमानाचे फ्रीझर्स आपल्या पोर्टफोलिओमध्ये समाविष्ट केले आणि लसीची शीतसाखळी आणखी मजबूत केली. या प्रगत वैद्यकीय फ्रीझरमध्ये जीवरक्षक औषधे आणि अति महत्त्वाच्या लसी उणे 80 अंश सेल्सियस या तपमानात ठेवता येतात. भारतीय आणि जागतिक अशा दोन्ही वैद्यकीय शीतसाखळीला चालना देण्याच्या उद्देशाने हे फ्रीझर बनविण्यात आले आहेत.

भारतात देण्यात येत असलेल्या व तपमानाबाबत अतिसंवेदनशील असलेल्या ‘कोवॅक्सिन’ आणि ‘कोविशील्ड’ या लसी साठवण्यासाठी, ऑक्टोबर 2020 मध्ये प्राप्त झालेल्या राष्ट्रीय निविदेचा एक भाग म्हणून, 2 ते 8 अंश सेल्सिअस तपमान तंतोतंत राखणारे खास रेफ्रिजरेटर्स सध्या ‘गोदरेज अप्लायन्सेस’कडून बनविले जात आहेत. ‘डायल्युंट्स’साठी उणे 20 अंश सेल्सियसचे तपमान राखणारे वैद्यकीय फ्रीझर्स आणि कोविड लसीकरण मोहिमेत अखेरच्या टप्प्यापर्यंत लसी नेण्यासाठी लागणारे ‘आईस पॅक’ हेदेखील कंपनीतर्फे तैनात करण्यात येत आहेत. विशिष्ट टप्प्यापलीकडे तपमानात चढ-उतार झाल्यास या लसींचे नुकसान होण्याची शक्यता असते, त्यामुळे मानवी आरोग्यावर विपरीत परिणाम होतो व आर्थिक नुकसानही होते.

‘अल्ट्रा-लो टेम्परेचर फ्रीझर’मुळे कंपनीच्या ‘पोर्टफोलिओ’मध्ये एक नवीन भर पडली आहे. विशेषत: सध्या इतर काही देशांमध्ये वितरीत करण्यात येणाऱ्या एमआरएनए-आधारित लसींसाठी हे फ्रीझर अनुकूल आहेत. ‘एमआरएनए-आधारित कोविड-19 लसी’ या तपमानाबाबत अति-संवेदनशील असतात आणि त्या अत्यंत थंड तपमानातच साठवाव्या लागतात. वातावरणातील इतर रेणूंमुळे नष्ट होण्याचा सततचा धोका ‘एमआरएनए’ला असतो. लस उत्पादकांनी ‘सिंथेटिक एमआरएनए’मध्ये रासायनिक बदल करून ते संरक्षक थरामध्ये गुंडाळले असले, तरी लसींचा अपव्यय रोखण्यासाठी त्या उणे 80 अंश सेल्सियसपेक्षा कमी तपमानात साठवणे आवश्यक असते; अन्यथा त्याचा थेट परिणाम मनुष्याच्या आरोग्यावर होतो. म्हणूनच, शीतगृह साखळीशी संबंधित लॉजिस्टिकल मुद्द्यांमुळे लसीकरण प्रक्रियेत कोणतीही नासाडी किंवा अकार्यक्षमता टाळली जाणे आवश्यक आहे.

‘गोदरेज अल्ट्रा-लो टेम्परेचर फ्रीझर’मध्ये, प्राथमिक व दुय्यम प्रणालीदरम्यान ‘हीट एक्सचेंजर’ म्हणून ‘पीएचई’ (प्लेट हीट एक्सचेंजर) असलेल्या ‘कॅसकेडिंग सिस्टीम’चे कार्यान्वयीन तत्व वापरण्यात आले आहे. या सिस्टीममध्ये दुय्यम प्रणालीतील स्थायी दबाव कमी करण्यात येतो, त्यामुळे तपमान कमी होते. याव्यतिरिक्त, ‘गोदरेज अल्ट्रा-लो टेम्परेचर फ्रीझर’मध्ये अलार्मसह ‘इनबिल्ट सेफ्टी सिस्टीम’देखील आहे. दुय्यम प्रणालीत दबाव वाढण्याची शक्यता असल्यास दुय्यम कॉम्प्रेसरला पुढील प्रकारे संरक्षण मिळते – (अ) तपमान वाढू नये, यासाठी 2 टप्प्यांतील सिलींग आणि अंतर्गत स्वतंत्र दरवाजे, (ब) ऑपरेशनदरम्यान युनिटच्या संपूर्ण कार्यक्षमतेस चालना देण्यासाठी, दुय्यम प्रणालीसाठी तेलाची पुनर्प्राप्ती. याउप्परही, ‘लिक्विड सीओटू’ किंवा ‘लिक्विड एनओटू’ यांसारखी ‘बॅक-अप सिस्टीम’ही यात देण्यात आली आहे. वीज खंडित झाल्यास किंवा यंत्रणेत बिघाड झाल्यास 48 तासांपेक्षा जास्त काळ स्थिर तपमान राखून, आतील लसींच्या साठ्याची सुरक्षितता या ‘बॅक-अप सिस्टीम’मुळे सुनिश्चित होते.

‘अल्ट्रा-लो टेम्परेचर फ्रीझर’ची सध्याची उत्पादन क्षमता वर्षाकाठी 12 हजार युनिट्स इतकी आहे. वाढती जागतिक मागणी पूर्ण करण्यासाठी हे उत्पादन वर्षाकाठी 30 हजार युनिट्स इतके त्वरेने वाढवण्याच्या दृष्टीने, गोदरेज अप्लायसेस प्रयत्न करीत आहे.

Show More

mh20live

आपल्या हक्काचे लोकप्रिय रोखठोक डिजिटल व्यासपीठ MH20LIve 🎥🖋️ mh20live चॅनल आपल्या हक्काचे चॅनल आपल्या भागातील ताज्या घडामोडी,संस्कृती, मनोरंजन व क्राइम बातम्या बघण्यासाठी www.mh20live.com आमच्या चॅनललाsubscribe करून घंटी समोरील बटन दाबा. mh20live Network अल्पावधीतच प्रसिद्धी मिळत असून महाराष्ट्रभर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे.संर्पक [email protected] MH20Live हे न्यूज पोर्टल mh20live Network Group यांनी प्रसारित केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे. औरंगाबाद न्याय कक्ष)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
Close
Close