Subscribe to our Newsletter
Loading
महाराष्ट्र

शेळीचा चक्क सहा सदृढ पिलांना एकाच वेळी जन्म…

सोयगाव:जुळ्या आणि तिळ्या जन्माची कहाणी आपण वाचली अथवा ऐकली असेल परंतु सोयगाव शहराच्या हाकेच्या अंतरावरील वेताळवाडीच्या जंगलात चक्क सहा पिलांना जन्म देणारी शेली भाग्यवान माता ठरली असून या पिलांची प्रकृतीही ठणठणीत आहे.हि घटना सोमवारी गलवाडा ता.सोयगाव गावात घडली आहे.जुळ्या आणि तिळ्या जन्मांची कहाणी ऐकली असतांना सोयगाव तालुक्यात चक्क सहा पिलांना जन्म एका शेळीने एकाच वेळी दिला आहे,आणि विशेष म्हणजे कोणत्याही पशुवैद्यकीय दवाखान्यात घेवून जाण्याची गरज पडली नसताना या सर्व पिलांची प्रकृती ठणठणीत असल्याचे पशुवैद्यकीय विभागाने सांगितले या प्रकारामुळे मात्र बघ्यांची गर्दी वाढली आहे.सध्याच्या पोषक वातावरणात शेळ्यांच्या प्रजनन शक्तीत वाढ झाली असल्याचा दावा पशुवैद्यकीय विभागाने केला असून गलवाड्यात या शेळीचा प्रकार पाहण्यासाठी मोठी गर्दी वाढली आहे.गलवाडा गावातील प्रवीण देविदास मोरे यांचा शेली पालन व्यवसाय आहे.त्यांच्याच कळपातील हि शेली असून या शेळीने चक्क सहा पिलांना जन्म दिला आहे.शेळ्यांची प्रजाती नेहमीच्या प्रजानानात दोन पिलांना जन्म देतात परंतु या शेळीने एकाच वेळी सहा पिलांना जन्म दिला.

https://www.facebook.com/Mh20live-102121051801545
Show More

mh20live

आपल्या हक्काचे लोकप्रिय रोखठोक डिजिटल व्यासपीठ MH20LIve 🎥🖋️ mh20live चॅनल आपल्या हक्काचे चॅनल आपल्या भागातील ताज्या घडामोडी,संस्कृती, मनोरंजन व क्राइम बातम्या बघण्यासाठी www.mh20live.com आमच्या चॅनललाsubscribe करून घंटी समोरील बटन दाबा. mh20live Network अल्पावधीतच प्रसिद्धी मिळत असून महाराष्ट्रभर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे.संर्पक [email protected] MH20Live हे न्यूज पोर्टल mh20live Network Group यांनी प्रसारित केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे. औरंगाबाद न्याय कक्ष)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
Close
Close