Subscribe to our Newsletter
Loading
क्राईम

ढाकेफळ येथिल शेळी पालकाचा ह्रदविकाराच्या तिव्र झटक्याने मृत्यु


पैठण / किरण काळे

नेहमी प्रमाणे शेळ्या चारण्याण्यासाठी गेलेल्या वयोवृद्ध शेळी पालकाचा ह्रदविकाराच्या तिव्र झटक्याने मृत्यु झाल्याची घटना दि.१३ जुन रोजी सायंकाळी उघडकीस आली.ढाकेफळ येथिल रहीवासी गोपीनाथ साहेबराव संत वय  ७०  वर्षे  हे रविवारी सकाळ पासुन शेळ्या चारण्यासाठी गेले आसता सायंकाळी ठरल्या वेळेवर घरी परतले नाही म्हणून त्यांच्या मुलांनी त्यांचा शोध सुरु केला असता परिसरातील एका शेतकऱ्याने  त्यांच्या मुलाला सांगितले की तुझे वडील खामजळगाव शिवारात उसाच्या शेतात एका लिंबाच्या झाडाखाली संशयस्पद अवस्थेत आढळून आले आहेत.त्यांच्या मुलांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन पाहनी केली असता त्यांचे वडील असल्याची खाञी झाली.गोपिनाथ संत हे खामजळगाव शिवारातील शेत मालक शिवाजी आडे यांच्या गट नं ५५ या शेतामध्ये बेशुद्ध अवस्थेत अढळून आले.     या घटनेची माहीती बिडकीन पोलिस ठाण्याला कळविण्यात आली.माहिती कळताच सहाय्यक  पोलिस निरीक्षक संतोष माने यांनी आपल्या सहकार्यांसह घटना स्थळी धाव घेतली. गोपीनाथ संत यांना तातडीने राञी उशिरा बिडकीन ग्रामीण रूग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय आधिकारी डाँक्टर वेद पाठक यांनी तपासुन मयत घोषीत करुन दि.१४ जुन सोमवार रोजी त्यांचे शवविच्छेदन करण्यात आले.त्यांचाह्रदविकाराच्या तिव्र झटक्याने मृत्यु झाला असल्याचे निष्पन्न झाले.पुढील तपासबिडकीन पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक संतोष माने यांच्या मार्गदर्शना खाली बिट जमादार गोविंद राऊत कॉन्टेबल समल वसावे हे करित आहेत.त्यांना खाम जळगावचे पोलिस पाटील निवृत्ती एरंडे,मुलानी वाडगाव बाळापुरचे पोलीस पाटील अप्पासाहेब तित्तर,मुलानी वाडगावच्या पोलीस पाटील सुनंदाताई रंगनाथ काळे,ढाकेफळचे पोलीस पाटील गोकुळ आढाव यांनी पोलीसांना सहकार्य केले.मयत गोपीनाथ संत यांच्या पश्चात पत्नी,दोन मुले,एक मुलगी,सुना नातवंडे असा परीवार आहे.

Show More

mh20live

आपल्या हक्काचे लोकप्रिय रोखठोक डिजिटल व्यासपीठ MH20LIve 🎥🖋️ mh20live चॅनल आपल्या हक्काचे चॅनल आपल्या भागातील ताज्या घडामोडी,संस्कृती, मनोरंजन व क्राइम बातम्या बघण्यासाठी www.mh20live.com आमच्या चॅनललाsubscribe करून घंटी समोरील बटन दाबा. mh20live Network अल्पावधीतच प्रसिद्धी मिळत असून महाराष्ट्रभर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे.संर्पक [email protected] MH20Live हे न्यूज पोर्टल mh20live Network Group यांनी प्रसारित केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे. औरंगाबाद न्याय कक्ष)

Related Articles

Back to top button
Close
Close