Subscribe to our Newsletter
Loading
महाराष्ट्र

ओबीसीला धक्का न लावता आम्हाला आरक्षण द्या”

नाशिक : मराठा समाजाच्या आरक्षणाचा मुद्दा चांगलाच गाजतो आहे. राज्य सरकार आणि मराठा आरक्षणाचे समन्वयक यांच्यात वारंवार खटके उडताना पहायला मिळत आहे. अशातच राज्य सरकारने मराठा समाजाला ईडब्ल्यूएस आरक्षणाच्या सवलती लागू करण्याचा निर्णय घेताल आहे. या निर्णयावरून मराठा संघटना आणि मराठा समाजाच्या नेत्यांनी चांगलीच आक्रमक भूमिका घेतली आहे. याच पार्श्वभूमिवर खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी आक्रमक भूमिका मांडली आहे. ईडब्ल्यूएस आरक्षण घेतल्याने मराठा समाजाला धोका होणार नाही, हे सरकारने स्पष्ट करून सांगावे, असे ठाकरे सरकारला खासदार संभाजीराजे यांनी आव्हान केले आहे.
ईडब्ल्यूएस आरक्षणावर खासदार संभाजीराजे यांनी भूमिका मांडताना यावर काही अक्षेप घेतले आहे. ते म्हणाले की, ईडब्ल्यूएस आरक्षण घेतल्याने एसईबीसी आरक्षणाला धोका निर्माण होईल, अशी शंका संभाजीराजे यांनी व्यक्त केली आहे. ईडब्ल्यूएस आरक्षण हे सर्व खुल्या प्रवर्गासाठी आहे. ते केवळ मराठा समाजासाठी नाही. पहिल्या दिवसापासून मराठा समाजाने सामाजिक मागासलेपण सिद्ध केल्याचेही संभाजीराजे म्हणाले. आपल्या न्यायव्यवस्थेवर विश्वास आहे, चांगला निर्णय अपेक्षित आहे, असे संभाजीराजे यांनी स्पष्ट केले आहे.
ओबीसी समाजात भीती : ओबीसी समाजात भीती निर्माण झाली हे खरे आहे. मात्र, ओबीसी समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता आम्हाला आरक्षण द्या, अशी मागणी संभाजीराजे यांनी केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीची आपण आजही वाट पाहत आहोत. पण अद्याप त्यांचा वेळ मिळाला नाही, अशी खंत संभाजीराजे यांनी व्यक्त केली आहे.
चव्हाणांची हकालपट्टी करून मार्ग निघणार नाही : मराठा आरक्षणावरील स्थगिती हटवण्यास सर्वोच्च न्यायालयाने तूर्तास नकार दिला आहे. त्यावरुन अशोक चव्हाण यांची मराठा आरक्षण उपसमितीच्या अध्यक्षपदावरुन हकालपट्टी करण्याची मागणी शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे आणि काही मराठा संघटनांनी केली आहे. त्यावर बोलताना अशोक चव्हाण यांची हकालपट्टी करुन मार्ग निघणार नाही, असे स्पष्ट मत संभाजीराजे यांनी व्यक्त केले आहे.
राज्य सरकराच्य भूमिकेवर संभाजीराजे म्हणाले : खासदार संभाजीराजे यांनी राज्य सरकारची भूमिका डळमळीत आहे, असे म्हंटले आहे. आर्थिक दुर्बल घटक अर्थात ईडब्लूएसचा धोरणात्मक निर्णय सरकारने घेऊ नये, अशी भूमिका खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी घेतली आहे. ईडब्लूएस आरक्षणाला माझा विरोध नाही, पण याचा धक्का एसईबीसीला लागणार नाही, याची हमी सरकार घेणार का? असा सवालही संभाजीराजे यांनी केलाय. मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मुद्द्यावर आता 25 जानेवारीला सुनावणी होणार आहे, असे संभाजीराचे यांनी स्पष्ट केले आहे.

Show More

mh20live

आपल्या हक्काचे लोकप्रिय रोखठोक डिजिटल व्यासपीठ MH20LIve 🎥🖋️ mh20live चॅनल आपल्या हक्काचे चॅनल आपल्या भागातील ताज्या घडामोडी,संस्कृती, मनोरंजन व क्राइम बातम्या बघण्यासाठी www.mh20live.com आमच्या चॅनललाsubscribe करून घंटी समोरील बटन दाबा. mh20live Network अल्पावधीतच प्रसिद्धी मिळत असून महाराष्ट्रभर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे.संर्पक [email protected] MH20Live हे न्यूज पोर्टल mh20live Network Group यांनी प्रसारित केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे. औरंगाबाद न्याय कक्ष)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
Close
Close