Subscribe to our Newsletter
Loading
औरंगाबाद

अण्णासाहेब पाटील महामंडळ व जिल्हा उद्योग केंद्रातील कर्ज तरूण मराठा गरजवंत युवकांना द्या – मराठा क्रांती ठोक मोर्चाची मागणी

उपविभागिय अधिकारी स्वप्निल मोरे यांना निवेदन.

पैठण / MH20LIVE NETWORK
अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ व जिल्हा उद्योग केंद्रा मार्फत पैठण तालुक्यातील होतकरू तरूण कर्जाच्या फाईल दाखल करतात.परंतु तालुक्यातील राष्ट्रीयकृत बँका त्यांची हेळसांड करते.त्यांना अनेक चकरा मारण्यास लावतात तसेच अनेक जाचक कागदपञांची पुन्हा पुन्हा मागणी करून परेशान करतात याबाबत अनेक मराठा युवकांनी उद्योगासाठी कर्ज फाईल आँनलाईन तयार करून जमा केल्या आहेत.माञ बँक व्यवस्थापकाचा मनमानी कारभार आता चव्हाट्यावर आला असुन मराठा क्रांती ठोक मोर्चाच्या वतिने बँकांविरोधात आक्रमक भुमिका घेण्यात आली आहे.याबाबत उपविभागिय अधिकारी स्वप्निल मोरे यांना दि.१४ रोजी पैठण तहसिल कार्यालयात निवेदन देऊन कारवाई करण्याची मागणी केली आहे.

यामुळे मराठा तरूणांची मानसिकता खराब होत आहे.त्यांना यामुळे अपमानित व्हावे लागते.मराठा होतकरू तरूण युवकांना उद्याग उभारणीसाठी कर्जाची मोठ्या प्रमाणात गरज आहे.त्यांना वेळेवर कर्ज मिळाल्यास त्यांचे वेळीच उद्योग धंदे सुरू होऊन स्वतःचा व्यवसाय करणे सोईचे होईल.
परंतु पैठण तालुक्यात राष्ट्रीयकृत बँकेतील व्यवस्थापक म्हणतात की,आमच्याकडे कर्ज उपलब्ध नाही म्हणत तरूणांची सर्रास हेळसांड करतात.धनदांडग्या व दलाला मार्फत गेलेल्या लाभार्थ्यांनाच अण्णासाहेब पाटील महामंडळ व जिल्हा उद्योग केंद्राचा लाभ मिळतो.
अशा प्रकारे पैठण तालुक्यातील राष्ट्रीयकृत बँका व अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ व जिल्हा उद्योग केंद्रांकडुन आलेल्या मराठा तरूणांच्या कर्ज फाईल मंजुर करीत नसल्याने या सर्व बँक व्यवस्थापक व मराठा क्रांती ठोक मोर्चाच्या तालुक्यातील समन्वयक यांची आपल्या अध्यक्षतेखाली संयुक्त बैठक बोलावुन येत्या आठ दिवसात तडजोड करण्यात यावी नसता मराठा क्रांती ठोक मोर्चाच्या वतिने राज्याचे मुख्य समन्वयक रमेश केरे पाटील यांंच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यातील प्रत्येक राष्ट्रीयकृत बँकेसमोर आक्रमक पद्धतीने तिव्र आंदोलन छेडण्याचा इशारा मोर्चाचे समन्वयक किरण काळे पाटील यांनी दिला आहे.
यावेळी उपविभागिय अधिकारी स्वप्निल मोरे म्हणाले की,येत्या चार – पाच दिवसात राष्ट्रीयकृत बँकेचे व्यवस्थापक व मराठा क्रांती ठोक मोर्चाचे समन्वयक यांची पैठण तहसिल कार्यालयात संयुक्त बैठक घेऊन कर्जाच्या फाईलीचा दलाल,कमिशन व धनदांडगे मुक्त निपटारा कसा करता येईल यासाठी लवकरच बैठक घेण्यात येणार असल्याचे अश्वासन मोरे यांनी आंदोलकांना दिले.
याप्रसंगी समन्वयक किरण काळे पाटील,मनोज मुरदारे,कृष्णा उघडे,पवन शिसोदे,दिपक मोरे,अतुल मोरे,सुनिल एरंडे,नितीन शेळके,शिवाजी कणसे,सचिन आंबेकर,नवनाथ चौधरी,विलास औटी,गणेश विर,सचिन पाटील,प्रकाश मैंद,मनोज गायके,निरव पापुलवार,प्रसाद शिसोदे,संकेत शिंदे,योगेश चव्हाण,ज्ञानेश्वर टिळक यांच्यासह आदी समन्वयक, पदाधिकारी व सकल मराठा समाज मोठ्या संख्येने उपस्थीत होता.

Show More

mh20live

आपल्या हक्काचे लोकप्रिय रोखठोक डिजिटल व्यासपीठ MH20LIve 🎥🖋️ mh20live चॅनल आपल्या हक्काचे चॅनल आपल्या भागातील ताज्या घडामोडी,संस्कृती, मनोरंजन व क्राइम बातम्या बघण्यासाठी www.mh20live.com आमच्या चॅनललाsubscribe करून घंटी समोरील बटन दाबा. mh20live Network अल्पावधीतच प्रसिद्धी मिळत असून महाराष्ट्रभर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे.संर्पक [email protected] MH20Live हे न्यूज पोर्टल mh20live Network Group यांनी प्रसारित केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे. औरंगाबाद न्याय कक्ष)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
Close
Close