Subscribe to our Newsletter
Loading
औरंगाबाद

आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबाला तत्काळ मदत द्या -जिल्हाधिकारी सुनील चव्हाण

जिल्हास्तरीय समितीच्या बैठकीत 13 प्रकरणे पात्र

औरंगाबाद, दि.29 : जिल्ह्यातील आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबाला मानसिक आधार देत त्यांना तत्काळ मदत द्यावी, असे निर्देश जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी संबंधितांना आज येथे दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयात शेतकरी आत्महत्याबाबत जिल्हास्तरीय समितीची बैठक पार पडली यावेळी जिल्हाधिकारी श्री. चव्हाण बोलत हेाते. बैठकीस निवासी उपजिल्हाधिकारी संजीव जाधवर, अप्पर पोलिस अधीक्षक सुनील लांजेवार, जिल्हा उपनिबंधक अनिलकुमार दाबशेडे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी डॉ. तुकाराम मोटे, तसेच संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

जिल्ह्यात शेतकरी आत्महत्या होऊ नयेत, यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत.  शेतकरी आत्महत्या केलेल्या कुटुंबाला तत्काळ मदत मिळावी यासाठी कार्यवाही जलद पद्धतीने करावी, असे जिल्हाधिकारी श्री. चव्हाण यांनी निर्देशित केले. यावेळी बैठकीत दाखल झालेल्या एकूण 16 प्रकरणांवर सविस्तर चर्चा केली. त्यातील 13 प्रकरणे पात्र ठरली. 1 प्रकरण अपात्र तर 2 प्रकरणे प्रलंबित ठेवण्यात आली.

प्रारंभी श्री. जाधवर यांनी बैठकीत दाखल प्रकरणांची माहिती सादर केली. तसेच जिल्हाधिकारी यांच्या संकल्पनेतून शेतकऱ्याने आत्महत्या करूच नये तसेच आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबाला मानसिक आधार मिळवा व ते कुटुंब आर्थिकदृष्ट्या सक्षम होण्याच्या दृष्टीने उभारी 2.0 हा उपक्रम प्रशासनामार्फत जिल्ह्यात राबविण्यात येणार असून त्याबाबतचे सविस्तर सादीकरणही यावेळी करण्यात आले.

Show More

mh20live

आपल्या हक्काचे लोकप्रिय रोखठोक डिजिटल व्यासपीठ MH20LIve 🎥🖋️ mh20live चॅनल आपल्या हक्काचे चॅनल आपल्या भागातील ताज्या घडामोडी,संस्कृती, मनोरंजन व क्राइम बातम्या बघण्यासाठी www.mh20live.com आमच्या चॅनललाsubscribe करून घंटी समोरील बटन दाबा. mh20live Network अल्पावधीतच प्रसिद्धी मिळत असून महाराष्ट्रभर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे.संर्पक [email protected] MH20Live हे न्यूज पोर्टल mh20live Network Group यांनी प्रसारित केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे. औरंगाबाद न्याय कक्ष)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
Close
Close