Subscribe to our Newsletter
Loading
राजकीय

राष्ट्रवादीकडून घरवापसीची साद, गणेश नाईक भाजप सोडणार?


मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते उपमुख्यमंत्री अजित पवार आणि प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जंयत पाटील यांनी पक्षात घरवापसी होणार असल्याचे संकेत दिले होते. लोकसभा निवडणूक आणि विधानसभा निवडणुकीच्या काळात भाजपमध्ये गेलेले नेते आगामी काळात राष्ट्रवादीत येऊ शकतात, असं जयंत पाटील म्हणाले होते. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणाऱ्या नेत्यांच्या यादीत नवी मुंबईतील भाजप आमदार गणेश नाईक यांच्या नावाचा समावेश असल्याचा अंदाज वर्तवण्यात येतोय, मात्र, गणेश नाईक यांनी राष्ट्रवादी प्रवेशाच्या चर्चा फेटाळल्या आहेत. (Ganesh Naik clear his stand on joining NCP)

गणेश नाईक काय म्हणाले?

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याच्या बातम्या कपोलकल्पित असल्याचे भाजपचे ऐरोलीचे आमदार गणेश नाईक म्हणाले. नाईक यांनी भाजप सोडण्याचा प्रश्नच येत नसल्याचे स्पष्ट केले. पक्ष प्रवेशाच्या खोट्या बातम्या पेरुन विरोधकांचे मनसुबे पूर्ण होणार नसल्याचा टोला गणेश नाईकांनी लगावला आहे.नवी मुंबईत सिडकोच्या माध्यमातून उभारण्यात येणाऱ्या पंतप्रधान आवास योजनेची घरे ही बस स्टँड ,रेल्वे स्थानकांच्या पार्किंगच्या जागेत उभारली जात आहेत. हा निर्णय कोणत्या बुद्धिवान माणसाने घेतला?, असा थेट सवाल भाजप आमदार गणेश नाईक यांनी केला होता.ही योजना नवी मुंबईतून हलवून पनवेल जवळील नैना क्षेत्रात राबवण्यात यावी, अशी मागणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडेच पत्राद्वारे करणार असल्याचे आमदार गणेश नाईक यांनी सांगितले.

भाजप सोडून परत या, अजित पवारांची साद

एकीकडे जयंत पाटलांनी मेगाभरतीची घोषणा केली, तर दुसरीकडे अजित पवारांनीही थेट नेत्यांना साद घालून, राष्ट्रवादीत परत येण्याचं आवाहन केलं. इतकंच नाही तर जे कुणी भाजपचा राजीनामा देऊन महाविकास आघाडीत येतील त्यांच्या विरोधात भाजप साहजिकच उमेदवार देईल. पण आम्ही तीनही पक्ष मिळून त्यांना निवडून आणण्याचा प्रयत्न करु”, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली.

अजित पवार, जयंत पाटील यांच्या या आवाहनानंतर आता राष्ट्रवादीतून गेलेले दिग्गज नेते आता कोणता निर्णय घेणार, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

राष्ट्रवादीची मेगाभरती
“भाजपमध्ये दहापेक्षा जास्त आमदार नाराज असून, राष्ट्रवादीत लवकरच मेगाभरती होणार आहे”, असा दावा राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदामंत्री जयंत पाटील (Jayant Patil) यांनी केला. जयंत पाटील यांनी हे विधान करुन राष्ट्रवादी सोडून गेलेल्यांसाठी आपली दारं पुन्हा उघडी असल्याचं त्यांनी दाखवून दिलं आहे.

“गेले काही दिवस अनेक सदस्य चर्चा करत आहे. हाताच्या दोन्ही बोटांपेक्षा जास्त सदस्य भाजपमध्ये नाराज आहेत, त्यांना तिथे उबग आलेली आहे, त्यांच्यातील बऱ्याच जणांचा राष्ट्रवादीकडे येण्याचा कल आहे, लवकर निर्णय घेतला जाईल”, असं जयंत पाटलांनी म्हटलं.

Show More

mh20live

आपल्या हक्काचे लोकप्रिय रोखठोक डिजिटल व्यासपीठ MH20LIve 🎥🖋️ mh20live चॅनल आपल्या हक्काचे चॅनल आपल्या भागातील ताज्या घडामोडी,संस्कृती, मनोरंजन व क्राइम बातम्या बघण्यासाठी www.mh20live.com आमच्या चॅनललाsubscribe करून घंटी समोरील बटन दाबा. mh20live Network अल्पावधीतच प्रसिद्धी मिळत असून महाराष्ट्रभर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे.संर्पक [email protected] MH20Live हे न्यूज पोर्टल mh20live Network Group यांनी प्रसारित केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे. औरंगाबाद न्याय कक्ष)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
Close
Close