Subscribe to our Newsletter
Loading
महाराष्ट्र

डीएन जाधव यांना मोठे करण्यासाठी उर्जा द्या: डॉ. विनायक तुमराम


बुलढाणा- : व्यक्तीची गुणवत्ता व तिचे समाजाप्रति सेवा – समर्पण – त्याग पाहायचे की जाती – धर्माच्या- शास्राच्या सनातन काट्यावर व्यक्तिला तोलायचे- मापायचे हे आपण सर्वांना करवाये आहे.डीएन जाधव यांच्या वाड्:मयीन, सामाजिक व सांस्कृतिक कर्तृत्वाची- सेवा- त्यागाची उंची लक्षात घेऊन त्यांना मोठे करण्यासाठी उर्जा द्या असे नम्र आवाहन अखिल भारतीय झेप साहित्य संमेलनाध्यक्ष डॉ.विनायक तुमराम यांनी केले.
हिवरा आश्रम ( बुलढाणा) येथे विवेकानंद साहित्य नगरीत २० डिसेंबर ला दहाव्या अखिल भारतीय झेप साहित्य संमेलनाध्यक्ष पदावरून ते बोलत होते.यावेळी वकील विजयकुमार कस्तुरे, सज्जन टाकसाळे, संजय मोहिते, बबन महामुने, छाया बैसाणे- सोनवणे, दीपक सोनवणे, किरण डोंगरदिवे, राजेंद्र सपकाळ, टी. एस. चव्हाण आणि त्र्यंबक बरकले यांना मातोश्री हरणाबाई जाधव राज्य पातळीवरील पुरस्कार प्राचार्य डॉ. एम्. डी. कड पाटील यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. विचारपीठावर झेप साहित्य चळवळीचे संस्थापक डी. एन. जाधव, झेप पुरस्कार निवड समिती अध्यक्ष, लेखिका श्रीमती ए. बी. साळवे, स्वागताध्यक्ष शिवाजी घोंगडे यांची प्रमुख उपस्थिती होती.
डॉ. तुमराम पुढे म्हणाले, ‘ सोच ‘ आणि नजर बदलून परिवर्तनाचे, समता- समानतेचे व मानवतेचे किनारे गाठण्यासाठीच डीएन जाधव यांची अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या माध्यमातून ही अंतराळ ” झेप ” आहे. त्यातून त्यांची जनहिताची व्यापक भूमिका व तत्वासिध्द प्रवृत्ती यांचा प्रत्यय येतो. त्यांनी उभारलेले साहित्यपीठ हे वैचारिक बेरजेचे प्रात्यक्षिक आहे.
कवयित्री हरणाबाई जाधव यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण व दीपप्रज्वलन करून उदघाटन केल्यानंतर वकील अनंतराव वानखेडे म्हणाले डीएन जाधव हे आपल्या आईची आठवण ह्रदयात सतत रहावी म्हणून त्यांच्या नावे अखिल भारतीय पातळीवर विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या व्यक्तींना पुरस्कार देऊन सन्मानित करतात. विशेष म्हणजे हे पुरस्कार अखिल भारतीय पातळीवर झेप मराठी साहित्य संमेलन भरवून प्रदान करतात याचा मला विशेष अभिमान वाटतो. म्हणून मी या ठिकाणी त्यांचे अभिनंदन करतो. त्यांना शुभेच्छा देतो.
प्रास्ताविक करताना निमंत्रक प्राचार्य पंढरीनाथ शेळके म्हणाले , वाड्:मयीन संस्कृती दृढ व्हावी या हेतूने कवयित्री हरणाबाई जाधव यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ डीएन जाधव अखिल भारतीय साहित्य संमेलन भरवतात आणि आईच्या ऋणातून उतराई होण्यासाठी पत्रकारिता, शैक्षणिक, कृषी, कला, सांस्कृतिक आणि सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तींना मातोश्री हरणाबाई जाधव यांच्या नावाने पुरस्कार देऊन सन्मानित करतात, हे त्यांचे कार्य कौतुकास्पद आहे.
तत्पूर्वी सकाळी आठ वाजता हिवरा आश्रमात तथागत गौतम बुद्ध,स्वामी विवेकानंद, भगवान महावीर, संत ज्ञानेश्वर, स्वामी शुकदास महाराज यांच्या मुर्तीस संमेलनाध्यक्ष डॉ.विनायक तुमराम यांच्या हस्ते पुष अर्पण करण्यात आले.त्यानंतर संविधान ग्रंथ ऱ्यालीची सुरूवात सरपंच निर्मला डाखोरे, पोलीस पाटील रवि, घोंगडे, पोलीस पाटील विवेक लहाने यांच्या हस्ते करण्यात आली. यावेळी. संमेलनस्थळी चित्रप्रदर्शन मनोहर पवार यांच्या हस्ते. ग्रंथ व हस्तकला प्रदर्शन आर. बी. मालपाणी यांच्या हस्ते. रांगोळी प्रदर्शन रेणू जोशी यांच्या सह पाच महिलांच्या हस्ते करण्यात आले. स्वागत गीत व उदघाटन सत्राचे सूत्रसंचालन प्रसिद्ध गायक व कवी वकील विजयकुमार कस्तुरे यांनी केले तर आभार लेखक प्रा. अशोक सारडा यांनी मानले.

Show More

mh20live

आपल्या हक्काचे लोकप्रिय रोखठोक डिजिटल व्यासपीठ MH20LIve 🎥🖋️ mh20live चॅनल आपल्या हक्काचे चॅनल आपल्या भागातील ताज्या घडामोडी,संस्कृती, मनोरंजन व क्राइम बातम्या बघण्यासाठी www.mh20live.com आमच्या चॅनललाsubscribe करून घंटी समोरील बटन दाबा. mh20live Network अल्पावधीतच प्रसिद्धी मिळत असून महाराष्ट्रभर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे.संर्पक [email protected] MH20Live हे न्यूज पोर्टल mh20live Network Group यांनी प्रसारित केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे. औरंगाबाद न्याय कक्ष)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
Close
Close