Subscribe to our Newsletter
Loading
महाराष्ट्र

दानशूर उद्योगपती रतन टाटा यांना ‘भारतरत्न’ पुरस्कार द्या”

mh20live Newtork

पुणे :  दानशूर उद्योगपती रतन टाटा यांना ‘भारतरत्न’ पुरस्काराने गौरविण्यात यावे, असा पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेत हा ठराव मांडण्यात आला होता. गुरुवारी पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत मंजूर करण्यात आला. 

कोरोनाविरुद्धच्या लढाईसाठी ‘टाटा उद्योग’ समूहाने पीएम केअर फंडमध्ये तब्बल 1500 कोटी रुपयांची देणगी दिली होती. याशिवाय, मुंबई येथील हॉटेल ताज विनामोबदला कोरोना विरुद्धच्या लढ्यामध्ये काम करणारे वैद्यकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांना राहण्यासाठी उपलब्ध करून देण्यात आले होते. देशावर आलेल्या प्रत्येक संकटावेळी रतन टाटा हे मदतीसाठी पुढे सरसावले आहेत. टाटा मोटर्स हा पिंपरी-चिंचवड शहराच्या जडणघडणीत व नावलौकिकात भर टाकणारा मोठा उद्योग समूह आहे. त्यामुळे रतन टाटा यांना ‘भारतरत्न’ पुरस्काराने सन्मानित करावे, अशी शिफारस पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेने केंद्र सरकारला केली आहे. रतन टाटा यांना ‘भारतरत्न’ देण्याचा ठराव उपसूचनेद्वारे करण्यात आला. या उपसूचनेला एकमताने मान्यता देण्यात आली. त्यामुळे केंद्र सरकार आता सरकार पिंपरी-चिंचवड महानगपालिकेच्या शिफारशीचा विचार करणार का, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.

Show More

mh20live

आपल्या हक्काचे लोकप्रिय रोखठोक डिजिटल व्यासपीठ MH20LIve 🎥🖋️ mh20live चॅनल आपल्या हक्काचे चॅनल आपल्या भागातील ताज्या घडामोडी,संस्कृती, मनोरंजन व क्राइम बातम्या बघण्यासाठी www.mh20live.com आमच्या चॅनललाsubscribe करून घंटी समोरील बटन दाबा. mh20live Network अल्पावधीतच प्रसिद्धी मिळत असून महाराष्ट्रभर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे.संर्पक [email protected] MH20Live हे न्यूज पोर्टल mh20live Network Group यांनी प्रसारित केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे. औरंगाबाद न्याय कक्ष)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
Close
Close