Subscribe to our Newsletter
Loading
महाराष्ट्र

इच्छा असेल तर EWS चे आरक्षण घ्या, जबरदस्ती नाही- विजय वडेट्टीवार

पुणे : महाराष्ट्राचे मदत व पुनर्वसन मंत्री आणि काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील महाविकासआघाडीने सरकारने दिलेल्या ईडब्ल्यूएस आरक्षणाचं (EWS) समर्थन केलं आहे. तसेच ईडब्ल्यूएस आरक्षणाचा मराठा आरक्षणाच्या सुनावणीवर परिणाम होणार नसल्याचंही स्पष्ट केलं. यावेळी त्यांनी ईडब्ल्यूएस आरक्षणाचं (EWS) हे ऐच्छित असून कुणावरही त्याची जबरदस्ती नाही. इच्छा असेल त्याने या आरक्षणाचा लाभ घ्यावा, असंही मत व्यक्त केलं. ते पुण्यात पत्रकार परिषदेत बोलत होते

विजय वडेट्टीवार म्हणाले, “ESW चे आरक्षण हे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून आहे. हे आरक्षण ऐच्छिक आहे. इच्छा असेल तर आरक्षण घ्या, या आरक्षणाची जबरदस्ती नाही. या आरक्षणाचा निर्णय घेताना तज्ज्ञांचा सल्ला घेतला आहे. त्याचा सुनावणीवर परिणाम होणार नाही. मागील सरकारने SEBC मधून आरक्षण दिलं त्यावेळी ओबीसीला धक्का लावणार असं म्हटलं होतं. सराटे यांनी त्यानंतर याचिका दाखल केली.”
“मंडल आयोगाने आम्हाला ओबीसी ठरवलं आहे. ओबीसी आरक्षणाला धक्का लागणार नाही. देवेंद्र फडणवीस यांनीही ओबीसी आरक्षणाला धक्का लागणार असं म्हटलं आहे. ओबीसीमध्ये मराठा समाजाचा समावेश होणारच नाही. मराठा आरक्षणाच्या सुनावणीमध्ये काहीही अडचणी येणार नाही. EWS आरक्षण ऐच्छिक आहे,” असं मत विजय वडेट्टीवार यांनी व्यक्त केलं.

Show More

mh20live

आपल्या हक्काचे लोकप्रिय रोखठोक डिजिटल व्यासपीठ MH20LIve 🎥🖋️ mh20live चॅनल आपल्या हक्काचे चॅनल आपल्या भागातील ताज्या घडामोडी,संस्कृती, मनोरंजन व क्राइम बातम्या बघण्यासाठी www.mh20live.com आमच्या चॅनललाsubscribe करून घंटी समोरील बटन दाबा. mh20live Network अल्पावधीतच प्रसिद्धी मिळत असून महाराष्ट्रभर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे.संर्पक [email protected] MH20Live हे न्यूज पोर्टल mh20live Network Group यांनी प्रसारित केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे. औरंगाबाद न्याय कक्ष)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
Close
Close