देवगिरी साखर कारखान्याच्या सर्वसाधारण सभेस परवानगी

औरंगाबाद: फुलंब्री येथील देवगिरी सहकारी साखर कारखाना यांनी मागणी केल्याप्रमाणे कारखाना विशेष सर्वसाधारण सभा घेण्यास अटी व शर्तींच्या अधीन राहून परवानगी देण्यात येत असल्याचे आदेश जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी निर्गमित केले आहेत.हॉलमध्ये प्रत्येक व्यक्तींमध्ये किमान 6 चौरस फूट (दो गज की दूरी) या प्रमाणात बैठक व्यवस्था करावी. सदरील सभा आयोजित करणारे आयोजक, साधन व्यक्ती, सुरक्षा रक्षक इ.नी जवळच्या मनपा, स्थानिक स्वराज्य संस्थेमार्फत RT-PCR Test करणे बंधनकारक राहील, याबाबत खात्री करुनच प्रवेश दयावा. संबंधित सर्वांनी आरोग्य सेतु अॅप डाऊनलोड करणे बंधनकारक राहिल. तसेच सदरील अॅपमध्ये संबंधितांची नाव नोंदणी झाल्याबाबतची खात्री सभेच्या आयोजकांनी करावी, कोविड-19 अंतर्गत केंद्र शासन, राज्य शासन यांनी वेळोवेळी दिलेल्या निर्देशांचे पालन करणे बंधनकारक राहिल. कोरोना विषाणूचा प्रादूर्भाव टाळण्यासाठी Social Distancing पाळून भौतिकदृष्टया कमीत कमी संपर्क येईल याची दक्षता घ्यावी, सर्वसाधारण सभेचा हॉल सभेपूर्वी व सभेनंतर Sodium Hypochlorite च्या द्रावणाने सॅनीटाईज करणे बंधनकारक राहिल, सर्वसाधारण सभेच्या प्रवेशाच्या वेळी सॅनीटाईजरची किंवा साबणाने हात स्वच्छ धुण्याची व्यवस्था करावी. कोविड 19 साथरोग संबंधी, सर्दी, खोकला, ताप, श्वसनसंस्थेशी संबंधित लक्षणे असणा-यांना प्रवेश देवू नये, शक्यतो संबंधित सर्वांनी हॅण्डग्लोजचा वापर करावा तसेच मास्क, फेसकव्हर लावणे बंधनकारक राहिल, सर्वसाधारण सभेला येणा-या प्रत्येक व्यकतीचे तापमान (Thermal Screening) व O2 Level याची Pulse Oxymeterवर नोंद घेऊन नोंदवहीमध्ये नोंद करावी, सभेच्या वेळी सभा हॉलमध्ये प्रवेशाची व सभा संपल्यानंतर बाहेर पडण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था करावी, केवळ मास्क लावलेल्या व्यकतींनाच सभा हॉलमध्ये प्रवेश करण्याची परवानगी द्यावी. (No Mask-No Entry……..) केवळ Asymptomatic व्यक्तींनाच सभेसाठी प्रवेश द्यावा, 60 वर्षावरील व्यक्तींना सभेसाठी प्रवेश देवू नये, कोविड-19 शी संबंधित वेळोवेळी निर्गमित होणारे शासन परीपत्रक, आदेश, निर्णय व या कार्यालयाचे आदेशाचे पालन करण्यास कसूर केल्याचे निदर्शनास आल्यास संबंधित संस्थेत जबाबदार धरुन तात्काळ संस्था सील करण्यात येईल, अशा अटी व शर्ती आहेत.अटी व शर्तींचे पालन न करणारी संस्था अथवा समूह, उल्लंघन करणारी कोणतीही व्यकती यांनी साथरोग प्रतिबंधक कायदा 1897 व आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 तसेच भारतीय दंड संहिता 1860 नुसार शिक्षेस पात्र असलेला अपराध केला असे मानण्यात येईल व नियमानुसार कारवाई करण्यात येईल. याची संबंधितांनी नोंद घ्यावी, असेही आदेशात नमूद आहे.