जीडीसीएसीएचएम परीक्षा 27 ते 29 मे दरम्यान होणार
औरंगाबाद, दि.24, : जीडीसी ॲण्ड ए व सीएचएमद्वारा सहकार आयुक्त व निबंधक सहकारी संस्था, पुणे यांच्यामार्फत 27 ते 29 मे दरम्यान विवेकानंद कला, सरदार दलिपसिंग वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, समर्थनगर,औरंगाबाद या केंद्रावर जीडीसीए ॲण्ड सीएचएम 2020 ची परीक्षा दोन सत्रात सकाळी 10 ते 1 व दुपारी 2 ते 5 वाजेपर्यंत घेण्यात येणार असल्याचे केंद्र प्रमुख तथा जिल्हा उपनिबंधक सहकार संस्था, औरंगाबाद यांनी प्रसिध्दीपत्रकान्वये कळविले आहे.
परीक्षार्थींना प्रवेशपत्रे ऑनलाईन देण्यात येणार आहेत. ज्या परीक्षार्थींना ऑनलाईन तांत्रिक अडचणीमुळे प्रवेशपत्र मिळाले नाही. मात्र, ज्यांच्या नावाचा समावेश पात्र यादीमध्ये असेल, अशा परीक्षार्थींना ओळखपत्र (ड्रायव्हिंग लायसन्स, पॅनकार्ड, आधारकार्ड, निवडणूक ओळखपत्र) याची खात्री करुन परीक्षेस बसण्याची परवानगी देण्यात येईल. परीक्षेचे हॉल तिकीट परीक्षार्थींच्या प्रोफाईलवर ऑनलाईन उपलब्ध आहे, याची परीक्षार्थींनी नोंद घ्यावी. अधिक माहितीसाठी जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, औरंगाबाद, शक्ती सहकार बिल्डिंग, दुसरा मजला, सी.बी.एस. रोड, औरंगाबाद दूरध्वनी क्रमांक 0240-2331037 या कार्यालयास संपर्क साधावा, असेही आवाहन करण्यात आलेले आहे.