Subscribe to our Newsletter
Loading
देशविदेशशेतीविषयक

पंतप्रधान मोदींच्या प्रश्नावर महाराष्ट्रातील शेतकरी गणेश भोसलेंनी दिलं ‘हे’ उत्तर

मागच्यावर्षी सोयाबीनच्या पीकाचे नुकसान झाले, तेव्हा…

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी आज पंतप्रधान किसान सन्मान निधी (PM Kisan Samman Nidhi) वितरणाच्या निमित्ताने शेतकऱ्यांशी संवाद साधला. यावेळी मोदींनी विविध राज्यातील शेतकऱ्यांचा अनुभव जाणून घेतला. व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे मोदींनी शेतकऱ्यांना पीकपाणी, पीक विमा, पशुपालन यासह वेगवेगळ्या विषयांवर बोलतं केलं. यावेळी महाराष्ट्रातून लातूरच्या शेतकऱ्याने मोदींशी संवाद साधला.

गणेश भोसले असे या शेतकऱ्याचे नाव आहे. महाराष्ट्रातील लातूर जिल्ह्यातील अवसा तालुक्याती मातुला गावात हा शेतकरी राहतो. त्याची तीन हेक्टरची शेती असून, यात तो सोयाबीन, तूर ही पीके घेतो. शेतीशिवाय आपल्याकडे नऊ गायी आणि तेरा म्हशी असल्याचे त्याने सांगितले. दूध विक्रीचा सुद्धा व्यवसाय असल्याचे गणेश भोसलेंनी मोदींना सांगितले.
शेती कि, पशूपालनातून जास्त कमाई होते ? असा प्रश्न मोदींनी विचारला. त्यावर दोघांमधून बऱ्यापैकी उत्पन्न मिळते, त्यातून घर आणि शेती चालते असे त्यांनी सांगितले. गणेश भोसले यांनी पंतप्रधान कृषी विमा योजना काढली होती. या कृषी विमा योजनेचा लाभ झाला का? असा प्रश्न मोदींनी या शेतकऱ्याला विचारला.२०१९ मध्ये पंतप्रधान पीक विमा योजनेत २५८० रुपयाचा हप्ता भरला होता. मागच्यावर्षी सोयाबीनच्या पीकाचे नुकसान झाले. तेव्हा पीक विमा योजनेमुळे ५४ हजार ३१५ रुपये मिळाल्याचे त्यांनी मोदींना सांगितले. तुम्ही २५८० रुपये भरले आणि ५४ हजार रुपये मिळाले, हे गावातील सर्व शेतकऱ्यांना माहिती आहे का? त्यावर भोसलेंनी, हो सर्वांना माहिती आहे, असे उत्तर दिले. मोदींनी नंतर भाषण करताना पंतप्रधान कृषी विमा योजनेचे महत्त्व पटवून देताना महाराष्ट्रातील या शेतकऱ्याचे उदहारण दिले.

Show More

mh20live

आपल्या हक्काचे लोकप्रिय रोखठोक डिजिटल व्यासपीठ MH20LIve 🎥🖋️ mh20live चॅनल आपल्या हक्काचे चॅनल आपल्या भागातील ताज्या घडामोडी,संस्कृती, मनोरंजन व क्राइम बातम्या बघण्यासाठी www.mh20live.com आमच्या चॅनललाsubscribe करून घंटी समोरील बटन दाबा. mh20live Network अल्पावधीतच प्रसिद्धी मिळत असून महाराष्ट्रभर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे.संर्पक [email protected] MH20Live हे न्यूज पोर्टल mh20live Network Group यांनी प्रसारित केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे. औरंगाबाद न्याय कक्ष)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
Close
Close