Subscribe to our Newsletter
Loading
औरंगाबाद

सुपर संभाजीनगरच्या विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही : ना. एकनाथ शिंदे

रोकडिया हनुमान कॉलनी येथे विविध विकासकामांचे भूमिपूजन सोहळा संपन्न


संभाजीनगर :संभाजीनगर शहर ” सुपर संभाजीनगर ” च्या दिशेने वाटचाल करत असून शहराला सुपर संभाजीनगर बनविण्यासाठी निधी कमी पडू देणार नाही अशी घोषणा नामदार एकनाथ शिंदे यांनी केली रोकडिया हनुमान कॉलनी येथे विकास कामांच्या भूमिपूजन प्रसंगी आले असता ते बोलत होते.
शिवसेना जिल्हाप्रमुख आमदार अंबादास दानवे यांच्या विशेष प्रयत्नातून महानगरपालिका क्षेत्रात मूलभूत सोयी सुविधांच्या विकासासाठी या योजनेअंतर्गत ५ कोटी निधी मंजूर निधीतून २३ विकास कामांचा शुभारंभ महाराष्ट्र राज्याचे नगरविकास व सार्वजनिक बांधकाम उपक्रम मंत्री नामदार एकनाथ शिंदे साहेब यांच्या हस्ते करण्यात आला , यावेळी रोहयो मंत्री संदिपान भुमरे साहेब, संपर्कप्रमुख विनोद घोसाळकर, आमदार प्रदीप जैस्वाल, आमदार संजय शिरसाट, माजी सभागृहनेता विकास जैन डॉक्टर सचिन सावजी यांची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी बोलताना नामदार एकनाथ शिंदे साहेब म्हणाले की महाराष्ट्राचे सरकार हे क्रांतिकारी निर्णय घेणारे सरकार असून शहराच्या विकासाच्या दृष्टिकोनातून पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी २०२० पासून पुढे ३० वर्ष म्हणजे २०५० पर्यंत शहरवासियांना पाणी मिळण्यासाठी कोणतीही अडचण येणार नाही यासाठी १६८० कोटी रुपयांची पिण्याच्या पाण्याची योजना मंजूर केली आहे, गुंठेवारीत असलेले २०२० पर्यंतची घरे नियमित होणार असून बांधकाम परवानगी साठी असणाऱ्या अटी शर्थी शिथील करण्यात आल्या असून यामुळे सामान्यातल्या सामान्य माणसांना सुद्धा परवडणारी घरे मिळणार आहेत. एमएसआरडीसी , एमआयडीसी, महानगरपालिका यांच्या माध्यमातून १५३ कोटीचे रस्ते शहरात होत आहे काही रस्ते तयार होऊन पूर्ण झाले आहेत व यापुढेही शहराच्या विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही असे आश्वासन यावेळी ना. एकनाथ शिंदे साहेबांनी दिले.
यावेळी प्रास्ताविक करतांना शिवसेना जिल्हाप्रमुख आमदार अंबादास दानवे यांनी सुपर संभाजीनगरच्या विकासासाठी लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून मंजूर झालेल्या विविध विकासकामांची माहिती दिली. भविष्यातील नागरीकरण तसेच गरजा लक्षात घेता पायाभूत सुविधांच्या विकासासाठी अधिकाधिक गुणवत्तापूर्ण विकासकामे मार्गी लावण्यासाठी आपण प्रयत्नशील राहून आपल्या स्वप्नातील सुपर संभाजीनगर घडवू असे आश्वासन दिले
याप्रसंगी उपजिल्हाप्रमुख संतोष जेजुरकर अनिल पोलकर शहर प्रमुख बाळासाहेब थोरात विधानसभा संघटक राजू वैद्य सुशील खेडकर गोपाल कुलकर्णी उपशहर प्रमुख राजेंद्र दानवे हिरा सलामपुरे जयसिंह होलीये सभापती संपत छाजेड, माजी नगरसेवक गजानन मनगटे, शहर संघटक विद्या अग्निहोत्री राजश्री पोकळे विभाग प्रमुख नरेश भालेराव, सतीश कटकटे, मनोज उबाळे उपविभागप्रमुख बळीराम जाधव शाखाप्रमुख रणजीत दाभाडे गणेश अंबिलवादे सुभाष राजपूत,रोकड़िया हनुमान मंदिर ट्रस्टी श्री विनोद शेवतेकर, बाळासाहेब दानवे शिवाजी आपरे, अनिकेत राठोड, नागेश विचारे, सुशील बजाज, प्रदीप वाघ, सतीश विधाटे, राजेंद्र सेठी, प्रसाद अकोलकर, श्याम वाघमारे, विनोद माने, रामचंद्र दरक, रमेशचंद्र दरक, बालाप्रसाद दहाड़, डॉक्टर मूंदड़ा, जयनारायण धूत, सोमनाथ पंडित, दिलीप विधाटे, संजय सुराणा, नितिन कासलीवाल, परेश पाटनी, जिग्नेश भानुशाली, राकेश बेधडे, सुशील धूत, गोविंद दरक, ऋषिकेश देशपांडे, धर्मराज दानवे , बद्रीनाथ चव्हाण, ज्ञानेश्वर नवले ,सुनील केरे, कल्पना जोशी, सुषमा यादगिरे, पुष्पा तायड़े, सौ विधाटे, संगीता दानवे, प्रतिभा दानवे, कविता लोहिया आदी नागरिक पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते

Show More

mh20live

आपल्या हक्काचे लोकप्रिय रोखठोक डिजिटल व्यासपीठ MH20LIve 🎥🖋️ mh20live चॅनल आपल्या हक्काचे चॅनल आपल्या भागातील ताज्या घडामोडी,संस्कृती, मनोरंजन व क्राइम बातम्या बघण्यासाठी www.mh20live.com आमच्या चॅनललाsubscribe करून घंटी समोरील बटन दाबा. mh20live Network अल्पावधीतच प्रसिद्धी मिळत असून महाराष्ट्रभर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे.संर्पक [email protected] MH20Live हे न्यूज पोर्टल mh20live Network Group यांनी प्रसारित केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे. औरंगाबाद न्याय कक्ष)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
Close
Close